आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:स्टेन स्वामींच्या मृत्यूच्या विरोधात इतर आरोपींचे तुरुंगात उपोषण

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एल्गार परिषद-नक्षलवादी संबंध प्रकरणात अटक झालेले आदिवासी अधिकार कार्यकर्ते फादर स्टेन स्वामी यांच्या कोठडीत झालेल्या मृत्यूची चौकशी करावी, या मागणीने जोर धरला आहे. स्टेन यांचा मृत्यू म्हणजे संस्थागत हत्या आहे, असे म्हणत एल्गार परिषद प्रकरणातील इतर १० आरोपींनी नवी मंुबईच्या तळोजा तुरुंगात बुधवारी एक दिवसाचे उपोषण केले.

रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे, महेश राऊत, अरुण फरेरा, वर्नोन गोन्साल्विस, गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे, रमेश गायचोर आणि सागर गोरखे या आरोपींनी राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) अधिकारी आणि तळोजा तुरुंगाचे माजी अधीक्षक कौस्तुभ कुरलीकर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

८४ वर्षीय स्टेन स्वामी यांना एनआयएने आॅक्टोबर २०२० मध्ये रांची येथून यूएपीएनुसार अटक केली होती. ते नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात होते आणि सोमवारी मुंबईच्या एका रुग्णालयात त्यांचे निधन झाले होते. ते दीर्घकाळापासून आरोग्याच्या आधारावर जामिनासाठी कायदेशीर लढाई लढत होते.

बातम्या आणखी आहेत...