आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंजय राऊत हे स्वप्न पाहत असतात त्यांना स्वप्नात राहू द्या. राज्यात 106 आमदार आहेत. दोन्ही सदनात दोन तृतीयांश बहुमतही आम्हाला आहे. आमचे सरकार भक्कम असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. संजय राऊतांच्या वक्तव्यावर त्यांनी आपली प्रतिक्रीया माध्यमांसमोर व्यक्त केली.
ओबीसी आरक्षणासाठी दिल्लीवारी
मुख्यमंत्री म्हणाले की, राऊतांना जे बोलायचे ते बोलू द्या, त्यांना स्वप्नात राहू द्या पण आम्ही राज्याच्या जनतेच्या हिताचे निर्णय घेऊ. दिल्लीवारी यासाठीच की, ओबीसी समजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात प्रलंबित होते. त्यासाठी कार्य केले. कायदेविषयक बाबींबाबत बैठका घेतल्या. राज्यातील ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम राज्यसरकार करीत आहेत, सुप्रीम कोर्टालाही मी धन्यवाद दिले आहेत.
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार
मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ विस्तार लवकरच करणार आहोत. आम्ही सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय गेत आहोत. पेट्रोल डिझेल दरकपात, पन्नास हजार परतफेड, कर्ज प्रकरणे आणि प्रकल्पावर आम्ही काम करीत आहोत. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सरकारचे काम आम्ही थांबू दिले नाही. राज्याच्या हिताचे निर्णय घेत आहोत, त्यांच्यासाठी आम्ही कार्य करीत राहू आम्ही जनतेच्या प्रश्नावर गंभीर आहोत.
डाकेंचे योगदान अमुल्य
मुख्यमंत्री म्हणाले, लिलाधर डाकेंच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो, मी त्यांचे योगदान शिवसेनेत अगदी जवळून पाहिले. बाळासाहेबांसोबत सुरुवाचे नेते होते त्यात डाके यांचा समावेश आहे. शिवसेना वाढवण्याचे काम डाके यांनी केले. आज वाढलेली शिवसेना पाहतो त्यात डाके यांचे योगदान आहे. मंत्रीपद मिळनही त्यांची साधी राहणी आहे. शिवसेनेसाठी त्यांनी सर्वकाही त्यांनी केले.
काय म्हणाले होते संजय राऊत?
संजय राऊत आज सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ''उद्या महाराष्ट्रात पुन्हा सत्ता परिवर्तन झाले तर यात आश्चर्य वाटून घेऊ नका. शिंदे गटातील काही आमदार अस्वस्थ आहेत, त्यांना फसवले गेले. तेच आमदार आता आमच्या संपर्कात आहेत त्यामुळे सत्तापरिवर्तन अटळ असेल.''
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.