आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही अज्ञात शक्तींनी माथे भडकावण्याचे काम केले असावे त्याची चौकशी होईल, सर्व सत्य बाहेर येईल. आज जे काही झाले त्याचा धिक्कार करतो. माझा नेता म्हणाला शांत रहा म्हणून शांत आहे नाही तर..अशा शब्दातही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या इरादा व्यक्त केला.
हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका. शांत राहा उद्विग्न प्रतिक्रीया देऊ नका अशा सुचनाही पवार यांनी दिल्याचे आव्हाड म्हणाले. शरद पवार यांची आज भेट घेऊन ते सिल्व्हर ओकमधून बाहेर पडले त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले, आज जे काही झाले तो महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा अपमान आहे. राजकारणात मतभेद होते पण मनभेद नव्हते. आतापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे नैतृत्व शरद पवार यांनी केले आहे. पण चुकीच्या व्यक्तीकडे नैतृत्व गेले आहे त्यामुळे या आंदोलनाची अशी स्थिती झाली आहे.
आम्ही हल्ल्याचे प्रत्युत्तर देणार नाही
आम्ही एसची कामगारांच्या सोबत आहोत. त्यांचे संसार भक्कम झाले पाहिजे, पवारांची भूमिका एसटी कामगारांच्या बाजूने आहे. त्यामुळे त्यांनीच सांगितले की, या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ नका. आमचा एकही नेता एसटी कामगारांच्या विरोधात बोलणार नाही. शांत राहा उद्विग्न प्रतिक्रीया देऊ नका अशा सुचनाही पवार यांनी दिल्या आहेत अशी माहिती आव्हाड यांनी दिली.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही
82 वर्षांचा माणूस त्यांची पत्नी आणि नात घरी होते. ते वयोवृद्ध आहेत घरात ते एकटे असताना पोलिस नसताना हल्ला करता हे महाराष्ट्राच्या लोकांना पटणार नाही. मतभेद असावे, लोकशाहीत ते असतातच पण कुणी कुणाच्या घरी जावे आणि दरवाजावर दगड फेकावे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असेही आव्हाड म्हणाले.
काल पेढे वाटले पण..
काही अज्ञात शक्तींनी माथे भडकावण्याचे काम केले असावे चौकशी होईल, सर्व सत्य बाहेर येईल. लोकशाहीच्या मार्गावरती सोनेरी झालर महाराष्ट्राची आहे. त्याला धक्का लागू देऊ नका. 50 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांसाठी पवार लढले. ते एसटी कर्मचाऱ्यांच्या हृदयस्थानी होते हेही आव्हाड यांनी सांगितले.
मी धिक्कार करतो
जे काही झाले याचा धिक्कार करतो. माझा नेता म्हणाला शांत रहा म्हणून शांत आहे नाही तर..अशा शब्दातही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. महागाई वाढली पण आपण सर्व जय श्री राम म्हणू पण हे म्हणता म्हणता राम नाम सत्य आहे असेही म्हणावे लागेल असेही आव्हाड म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.