आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजय राऊतांचा इशारा:बंडखोर आमदारांनो शिस्त पाळा अन् प्रेमाने परत या; अन्यथा राजकीय कारकिर्द धोक्यात येईल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना आमदारांनी पक्षाची शिस्त पाळून सुरतहून मुंबईत परत यावे, त्यांना प्रेमाने स्विकारू जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांची आमदारकी रद्द होईल, निवडणुकीला सामोरे जावे लागेल अन् त्यांची राजकीय कारकीर्द धोक्यात येईल असा इशाराच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आज रात्री माध्यमांशी बोलताना दिला. एकनाथ शिंदे परत येतील अशी आशाही राऊत यांनी व्यक्त केली.

आमदारांचा खून होऊ शकतो

शिवसेनेच्या आमदारांचा खून होऊ शकतो. अनेक आमदारांनी तशा तक्रारी आमच्याकडे केली असून अकोल्यातील आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण झाले आहे. सुरतमध्ये शिवसेनेच्या आमदारांना भाजपकडून मारहाण झाली असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केला आहे.

आमचा आमदार भाजपच्या ताब्यात-राऊत

आमदार नितीन देशमुख हे सुरत येथे भाजपा तावडीत आहेत मुंबईतून त्यांचे अपहरण केले. सोमवारी रात्री त्यांनी स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना गुजरात पोलिस व गुंडांनी बेदम मारहाण केली. मुंबईतील गुंड तेथे आहेत गुजरातच्या भूमीवर हिंसा होत आहे असा आरोप संजय राऊत यांचा आहे.

शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेनंतर शिवसेनेत उभी फुट पडण्याचा चिन्हे आहेत. एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेचे काही आमदारही सुरतमध्ये गेले आहेत. त्या धर्तीवर संजय राऊत यांचे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे.

सुरतच्या हाॅटेलमध्ये गुंड

सुरतच्या हा‌ॅटेलमधून मुंबईतील काही गुंड गेले आहेत. भाजपचे नाव न घेता मोहीत कंबोज यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे. आमदारांना या गुंडासमोर बसावे लागावे हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

गृहमंत्र्यांनी मारहाणीची दखल घ्यावी

आमदारांना मारहाण झाली ही बाब खरी आहे या प्रकरणात अमित शाह यांनी लक्ष घालून देशाचे न्यायप्रिय गृहमंत्री आहेत हे दाखवून द्यावे असेही ते म्हणाले. एकनाथ शिंदे आमचेच आहेत त्यांनी प्रेमाने यावे.

शिवसेना आमदारांना मारहाण

शिवसेना आमदारांना भाजपकडून सुरतेत मारहाण झाली आहे. त्यांना किडनॅप करुन सुरतला नेले गेले असून त्यांच्या जीवाला धोका असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांचे म्हणणे आहे.

काही आमदार तपास यंत्रणेच्या दबावात

इडी आणि सीबीआयने आमच्यावर दबाव आणला आहे. काही जण दबावात आले आहेत, इडीची टाच आमच्यावरही आली पण आम्ही न घाबरता केंद्र सरकारच्या कुटनितीला सामोरे गेलो असेही राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत?

राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे आमच्या सर्वांचे सहकारी आणि मित्र आहे. अनेक वर्ष आम्ही पक्षात काम केले. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंसोबत त्यांनी काम केले. त्यांचा गैरसमज दुर झाला असेल तर तो दुर केला जाईल. आम्ही त्यांना विनंती केली की मुंबईत या आणि चर्चा करा.

अकोल्याच्या आमदाराचे अपहरण!

राऊत म्हणाले, अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांचे अपहरण करुन त्यांना सुरतमध्ये नेले आहे. अशा नऊ आमदारांना सुरतमध्ये नेल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार केली आहे.

शिवसेनेचे नेते सुरतला जाणार नाहीत

राऊत म्हणाले, पोटनिवडणुक कुणालाही नको आहे. मध्यावधी निवडणुकाही राज्याला नको आहेत त्यार परवणाऱ्या नाहीत असेही राऊत म्हणाले. शिवसेनेचे नेते सुरतमध्ये जाणार नाही. हा शिवसेनेचा प्रोटोकाॅल नाही, एकनाथ शिंदे यांनी मुंबईत यावे आणि आमच्याशी चर्चा करावी.

भाजपशी सामना करु

राऊत म्हणाले, भाजप ऑपरेशन कमळ राबवित आहेत. त्यांचा आम्ही सामना करणार आहोत. शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या नैतृत्वात उभी आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही राहू, पुर्ण ताकदीने आम्ही लढु.

ऑपरेशन कमळ यशस्वी होणार नाही

राऊत यांनी स्पष्ट केले की, राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपने ऑपरेशन लोट्स राबविले होते; तेथे त्यांना यश आले असले तरी महाराष्ट्रात भाजपला यश येणार नाही. आमचे दोन नेते सुरतला गेले आहेत ते एकनाथ कुटुंबियांशी चर्चा करणार आहेत असेही ते म्हणाले.

आमदार पत्नीची अपहरणाची तक्रार

शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या पत्नी प्रांजली यांनी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल केली आहे. माझे पती आज घरी पोहचायला पाहिजे होते. मात्र ते पोहचले नाहीत. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा आपल्याला संशय आहे, असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.