आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा कोरेगाव हिंसाचार:नवलखा जेलमधून बाहेर, पण महिनाभराची नजरकैद; चार वर्षांपासून होते कारागृहात

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर शनिवारी गौतम नवलखा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. गेल्या चार वर्षांपासून नवलखा तळोजा कारागृहात बंदिस्त होते. तथापि, जामिनावर सुटल्यानंतर आता ते पुढील महिनाभर नवी मुंबई येथील त्यांच्या घरात नजरकैदेत असतील, या अटीसह इतर अटींवर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता.

न्यायालयाच्या आदेशांनुसार, हाऊस अरेस्टच्या काळात गौतम नवलखा यांना कोणत्याही प्रकारचे टेलिकम्युनिकेशन म्हणजे लॅपटॉप, मोबाइल, कॉम्प्युटर आदी उपकरणांचा वापर करता येणार नाही. तसेच त्यांना कोणत्याही बेकायदा कृत्यातही सहभागी होता येणार नाही. माध्यमांशी संवाद साधता येणार नाही. तसेच या प्रकरणाशी संबंधित साक्षीदार किंवा कोणत्याही व्यक्तीशीही चर्चा करता येणार नाही.

एनआयएने त्यांच्या जामिनाला विरोध करताना तुषार मेहता यांनी गौतम नवलखा यांच्या नजरकैदेलाही विरोध केला होता. नवलखा यांचा या प्रकरणातील इलेक्ट्रॉनिक पुरावे गायब करण्याचा हेतू आहे, असे ते म्हणाले. त्यावर नवलखांचे वकील कपिल सिब्बल यांनी आक्षेप घेतला होता. नवलखा मुंबईत आपल्या बहिणीच्या घरी राहिले तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेला कोणता धोका आहे. ते आजारी असून त्यांना कोलोनोस्कॉपीसाठी ३ दिवसांच्या उपवासांची गरज आहे, असे सिब्बल म्हणाले होते.

कशासाठी झाली होती अटक
पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाड्यात ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद झाली होती. त्यात कबीर कला मंचाच्या बॅनरखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी या कार्यक्रमात नक्षली साहित्याचे वाटप झाल्याचा आरोप केला होता. तसेच त्यानंतरच भीमा कोरेगाव हिंसाचार भडकल्याचा दावा केला होता.

बातम्या आणखी आहेत...