आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले, त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे - अनिल देशमुख

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष्य शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख हे 15 फेब्रुवारी रोजी होम आयसोलेशनमध्ये होते असे म्हणता तर मग त्यांनी पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल केला होता. त्यावर अनिल देशमुख यांनी सोशल मीडियावरून स्पष्टीकरण दिले आहे.

अनिल देशमुख यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ”गेल्या काही दिवसांपासून काही लोकांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियातून चुकीच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे मी फार व्यथित झालो आहे. करोनाच्या एक वर्षाच्या काळात आमच्या पोलिसांचं मनोबल वाढवण्यासाठी मी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. नागपूरला पाच फेब्रुवारीला मी करोनाबाधित झालो. त्यानंतर ५ ते १५ फेब्रुवारी मी नागपूरच्या एलिक्झर रुग्णालयात दाखल होतो. १५ फेब्रुवारीला जेव्हा मला डिस्चार्ज मिळाला, तेव्हा होम क्वारंटाईनसाठी मी खासगी विमानाने नागपूरहून लगेच मुंबईला आलो”, असं देशमुख यांनी म्हटले आहे.

“होम क्वारंटाईन झाल्यानंतर मी लॉकडाऊनच्या सूचनेप्रमाणे रात्री उशिरा पार्कमध्ये प्राणायाम करण्यासाठी जात होतो. नागपूरमध्ये मी हॉस्पिटलला जाण्याच्या वेळेदरम्यान आणि मुंबईतील होम क्वारंटाईनच्या दरम्यान मी अनेकदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका किंवा कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो. होम क्वारंटाईननंतर एक मार्चपासून आमचं अधिवेशन होतं. त्याच्या कामाला मी लागलो. त्या दरम्यान अधिवेशनासाठी आमची जी प्रश्नोत्तरं होती. लक्षवेधी सूचना होत्या. त्याच्या मीटिंगसाठी माझ्या शासकीय निवासस्थानी अनेक अधिकारी येत होते. त्यानंतर शासकीय कामासाठी पहिल्यांदा २८ फेब्रुवारीला घराच्या बाहेर पडलो. जनतेत चुकीची माहिती किंवा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ज्या पद्धतीने जनतेला चुकीची माहिती देण्याचा किंवा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती देत आहे,” असं सांगत देशमुख यांनी क्वारंटाईनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेच्या आरोपांना उत्तर दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...