आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Owners At Least Complete The Figure Of 1 Lakh At This Rate Will 2 Crore Jobs Get At Least In The Next Life? Nationalist Congress Criticized The Prime Minister

'राष्ट्रवादी'चा पंतप्रधानांना सवाल:2 कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का? मालक 1 लाख जणांना तरी नोकरी द्या

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

''मालक, निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करा; या गतीने दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का? असा सवाल करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले.

राष्ट्रवादी काॅंग्रेसने त्यांच्या अधिकृत फेसबूक पेजवर अशा आशयाची पोस्ट करीत पंतप्रधानांवर शाब्दीक प्रहार केले आहेत.

काय आहे पोस्ट?

प्यारे देशवासियों, देशात 2014 पासून सत्तेत असलेल्या मोदी सरकारने नागरिकांना दिलेली आश्वासनं लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना तोंडपाठ झाली आहेत. त्यापैकी वर्षाला दोन कोटी रोजगाराचे स्वप्न रंगवलेल्या मोदी सरकारने लाजेखातर निदान एक लाखाचा आकडा तरी पूर्ण करायचा होता.

ही मोदी सरकारची नामुष्की

मागील आठ वर्षांच्या कार्यकाळात दोन कोटीप्रमाणे एकूण 16,00,00,000 इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित होती. मात्र टप्याटप्याने भरती प्रक्रिया करून देखील रोजगार एक लाखापर्यंतही पोहचत नाही, ही मोदी सरकारची नामुष्की म्हणावी लागेल.

हाच गंभीर प्रश्न

रोजगार एक लाखांपर्यंत पोहचत नाही आणि या गतीने मोदी सरकारचा कारभार चालत राहिला तर युवकांना दोन कोटी रोजगार पुढच्या जन्मात तरी मिळतील का हा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे देशात योग्य रोजगार निर्मिती होण्यासाठी 2024 मध्ये सक्षम सरकारची निर्मिती करण्याची जबाबदारी आता सुजाण मतदाराची आहे.

का केली टीका?

आज देशभरात 45 शहरांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये तब्बल 71000 युवक युवतींना नोकरीची नियुक्ती पत्रे देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 10.30 वाजता या मेळाव्यांमध्ये ऑनलाईन सहभागी होणार असून ते युवकांना संबोधित करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने किमान 1 लाख नोकरीचे नियुक्तीपत्र तरी द्यावे अशी टीकाही त्यांच्यावर केली आहे.

बातम्या आणखी आहेत...