आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा उद्रेक:कोरोना रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदींमध्ये पुरवठ्याविषयी चर्चा

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन राज्यातील चिंताजनक परिस्थितीविषयी माहिती दिली आहे

राज्यातील कोरोना परिस्थिती भयावह होत असताना दिसत आहे. रुग्णालयांमध्ये बेड मिळणे अवघड झाले आहे. तसेच रुग्णांना ऑक्सिजनही भेटत नाहीये. यावरुनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा केली आहे. राज्यात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. यावरुनच दोघांमध्ये संभाषण झाले. मुख्यमंत्र्यांनी आकडेवारीसह सर्व माहिती पंतप्रधानांना दिली आहे. यासोबतच जवळच्या राज्यातून ॲाक्सिजनचा पुरवठा व्हावा करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. पंतप्रधानांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अनेक रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला 1200 ते 1500 मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली. राज्यातील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमरता भारत आहे. यामुळे अनेक रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलवावे लागले. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना फोन करुन राज्यातील चिंताजनक परिस्थितीविषयी माहिती दिली आहे. यासोबतच ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचीही मागणी दिली आहे.

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 37 लाख 3,584 वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही 6 लाख 38,034 वर गेली आहे. एकूण मृतांची संख्या 59,551 झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनामुक्तांचा आकडा आता 30 लाख 4,391 झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81. 12 तर मृत्युदर 1.61%इतका आहे. राज्यात 15 एप्रिलपर्यंत एकूण 1कोटी 15 लाख 21 हजार 300 लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...