आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादर येथे सोहळा:वैद्य, बाविस्कर, कदम, साबळेंना पद्मश्री दया पवार स्मृती’ पुरस्कार

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा ‘पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार’ शनिवारी जाहीर करण्यात आला. यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड झाली आहे. सोबतच ‘भुरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर देण्यात येणार असल्याचे दया पवार प्रतिष्ठानचे सचिव प्रशांत पवार यांनी जाहीर केले.

कोरोनानंतर तीन वर्षांचे हे पुरस्कार जाहीर केले आहेत. हा पुरस्कार वितरण सोहळा २० सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. या सोहळ्यादरम्यान बीडचा विनोदी कलावंत अंकुर तांगडे आणि नागपूरच्या नेहा ठोंबरे यांचा ‘ब्लू मटेरियल-दलितों का शो(षण)’ हा प्रयोगही होणार आहे. यंदाचा हा २४ वा पुरस्कार सोहळा असून प्रत्येकी १० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दया पवार यांच्या चाहत्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...