आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:भिवंडीत एका 12 वर्षीय विद्यार्थ्याकडून ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा, आयोजकांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

ठाणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भिवंडीत एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी केल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही जणांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. शैक्षणिक शुल्क भरले नसल्याने एका खासगी शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारला होता. त्यामुळे मागील तीन ते चार दिवसांपासून मेरी पाठशाला या संस्थेचे सदस्य, विद्यार्थी आणि पालक शाळेबाहेर आंदोलन करत आहे. त्याचवेळी एका १२ वर्षीय विद्यार्थ्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणा दिली.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर याप्रकरणी आयोजकांविरोधात भिवंडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे. या घटनेनंतर काही काळ तणाव निर्माण झाला होता.

बातम्या आणखी आहेत...