आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बस कंडक्टरला अटक:नोकरीचे आमिष दाखवून तरुणींना ओढायचा आपल्या जाळ्यात, नंतर खासगी व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर टाकून कमवायचा हजारो डॉलर

पालघरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून महिलांचे लैंगिक शोषण करणे आणि खासगी व्हिडिओ पॉर्न वेबसाइटवर टाकल्याच्या आरोपात पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केले. आरोपी ठाणे म्युनिसिपल ट्रांसपोर्ट (टीएमटी) मध्ये बस कंडक्टरची नोकरी करतो.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनिंद झाडे असे आरोपीचे नाव आहे. आरोपी झाडेने शिव वैशाली नावाची एक वेबसाइट सुरू केली होती, त्यावर तो पॉर्न कंटेंट टाकायचा आणि हे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकांकडून पैसे घ्यायचा. क्राइम ब्रांचला या वेबसाइट अनेक तरुणींचे व्हिडिओ मिळाले, ज्यांना आरोपीने हिडन कॅमेऱ्यातून शूट केले होते.

पॉर्न व्हिडिओतून कमवले हजारो डॉलर

तपासात समोर आले की, आरोपीने आतापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून हजारो डॉलरची कमाई केली आहे. अनेक महिलांना लाखो रुपये पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपी आपल्या जाळ्यात ओढत असे. पीडित तरुणींपैकी एका पिझ्झा स्टोअरमध्ये काम करणाऱ्या तरुणीला लाखो रुपयांची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आरोपीने शारिरीक संबंध बनवले आणि व्हिडिओ वेबसाइटवर अपलोड केला. हा व्हिडिओ तरुणीच्या एका नातलगाने पाहिला आणि या प्रकरणाचा खुलासा झाला.

दोन पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराची गुन्हा दाखल

यानंतर आरोपी कंडक्टरविरोधात विक्रमगड पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास करत असताना अजून काही तरुणींचे आरोपीने लैंगिक शोषण केल्याचे क्राइम ब्रांचला समजले. यानंतर दुसऱ्या एका तरुणीने वालीव पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. याशिवाय नोव्हेंबर 2019 ते जून 2020 दरम्यान झाडेने एका 30 वर्षीय महिलेसोबत अनेकदा बलात्कार केल्याचेही उघड झाले. आरोपीवर बलात्काराशिवाय आयटी अॅक्ट अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.