आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर हिंसा प्रकरण:अटक केलेल्यांपैकी एका आरोपीत आढळला कोरोनाचा संसर्ग, 23 पोलिसांसह 43 लोकांची करणार तपासणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
पालघर हिंसाचाराच्या घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकावर दगडफेकही करण्यात आली होती. या प्रकरणात सध्या 115 लोकांना अटक करण्यात आली आहे. - Divya Marathi
पालघर हिंसाचाराच्या घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस पथकावर दगडफेकही करण्यात आली होती. या प्रकरणात सध्या 115 लोकांना अटक करण्यात आली आहे.
  • पालघरमध्ये आतापर्यंत 170 कोरोनाग्रस्तांची नोंद, तर 10 लोकांचा मृत्यू झाला आहे

पालघरमध्ये साधूंच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 115 आरोपींपैकी एक आरोपीला कोरोना असल्याचे समोर आले आहे. यानंतर त्याच्या संपर्कात येणाऱ्या 43 लोकांची तपासणी केली जात आहे. या 43 जणांमध्ये 23 पोलिसांचा समावेश आहे.

पालघर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिनकर गावित यांनी सांगितले की, पालघर लिंचिंग प्रकरणातील 55 वर्षीय एक आरोपी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. या आरोपीला 17 एप्रिल रोजी पकडण्यात आले होते. तेव्हापासून तो वाडा पोलिस ठाण्यात होता. संक्रमित डहाणूच्या दिव्य-वाकीपाडा येथील रहिवासी आहे. संक्रमित झाल्यानंतर त्याचा प्रवास इतिहास शोधला जात आहे. सोबतच त्याच्या कुटुंबाला होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. 

जेजे हॉस्पिटलच्या जेल वॉर्डात शिफ्ट केले जाणार

डॉ. गावित म्हणाले की, 28 एप्रिल रोजी सकाळी आरोपीच्या गळ्यातील स्वॅब टेस्ट घेण्यात आली, ज्यामध्ये तो निगेटिव्ह आढळला. मात्र शनिवारी सकाळी आणखी एक टेस्ट करण्यात आली ज्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याला आरएचमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आरोपीला मुंबईच्या जेजे रुग्णालयातील जेल वॉर्डात स्थलांतरित केले जाणार आहे. 

आरोपीत कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत

गावित म्हणाले की, आतापर्यंत आरोपीत कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मात्र आम्ही कोणताही धोका पत्करू शकत नाही. पालघर जिल्ह्यात आतापर्यंत 170 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली असून 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 59 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...