आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्यात भीषण अग्निकांड:​​​​​​​पालघर जिल्ह्यामध्ये एका फॅक्ट्रीत लागली आग, रबरच्या 300 पेक्षा जास्त मोठ्या पाइप्स आणि एक केमिकल टँकर जळून झाला खाक

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फायर ब्रिगेडनुसार ही लेव्हल 2 ची आग आहे

पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसी येथील कारखान्याच्या आवारातील शेकडो रबर पाईप्सला गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण होती की, जवळ उभ्या केमिकल टँकरलाही आग लागली. यानंतर या आगीने भीषण रुप धारण केले. ही आग किती भीषण होती याचा अंदाज कारखान्यातून निघणाऱ्या धुरावरुनच दिसत होता.

सध्या आग विझवण्यासाठी अग्निशमनदलाच्या सहा गाड्या घटनास्थळावर पोहोचल्या आहेत. रबर मटेरियल असल्यामुळे आग विझवण्यात थोडी अडचण निर्माण होत आहे.

फायर ब्रिगेडनुसार ही लेव्हल 2 ची आग आहे
तारापूर फायर ब्रिगेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाह, मात्र ही आग लेव्हल 2 ची होती. आग विझवण्यासाठी घटनास्थळी एक फोम टँकर बोलावण्यात आले आहे. अग्निकांडामध्ये कारखान्याचे खूप नुकसान झाले आहे. राज्यात लॉकडाऊन सुरू असताना इंडस्ट्रियल एरियामध्ये सोशल डिस्टेंसिंगसह कामकाज सुरू आहे.

300 पेक्षा जास्त मोठे पाइप जळून खाक
हा कारखाना कुंभवाली पोलिस स्टेशनपासून काही अंतरावर आहे. या अग्निकांडात 300 पेक्षा जास्त पाइप जळल्याची शक्यता आहे. सध्या या कारखान्याच्या आजुबाजूला जेवढे कारखाने आहेत. त्यांनाही आजसाठी बंद करण्यात आले आहे. असे मानले जात आहे की, अग्निशमन दल थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवेल.

बातम्या आणखी आहेत...