आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर मॉब लिंचिंग केस:सीबीआयकडून तपास करण्यास महाराष्ट्र पोलिसांचा विरोध, सर्वोच्च न्यायालयात आज या प्रकरणाची सुनावणी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनदरम्यान 16-17 एप्रिलच्या रात्री गुजरातमध्ये जाणाऱ्या दोन साधुंची त्यांच्या चालकासमवेत मारहाण करुन हत्या करण्यात आली होती
  • पोलिसांनी 11 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये म्हटले की, चोरीच्या संशयाने त्यांची हत्या करण्यात आली होती

16-17 एप्रिल रोजी पालघरमध्ये जमावाने दोन साधूंसह तीन जणांना मारहाण केली होती. सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात तीन याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाच्या सीबीआयच्या तपासाला विरोध दर्शवत महाराष्ट्र पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयात उत्तर दाखल केले आहे. या प्रकरणाची सुनावणी गुरुवारी होणार आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. आम्ही तपासणीचा तपशील सार्वजनिक करू शकत नाही. पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासाचा तपशील सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. यापूर्वी 27 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाचा सद्यस्थिती अहवाल दाखल केला होता.

अशाप्रकारे झाली होती साधूंची हत्या
लॉकडाऊन दरम्यान,16-47 एप्रिल रोजी रात्री आपले गुरु ब्रम्हलीन होण्याची बातमी समजताच गुजरातला जाणाऱ्या दोन साधूंना चालकासह जमावाने मारहाण केली. पोलिसांनी 11 हजार पानांच्या आरोप पत्रात असे म्हटले आहे की चोरीच्या संशयावरून तिन्ही जणांची हत्या झाली आहे. त्यात कोणताही धार्मिक अँगल नाही. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दीडशेहून अधिक लोकांना अटक केली. ज्यामध्ये बरेच कोरोना पॉझिटिव्ह देखील आले. या घटनेत निष्काळजीपणा केल्याबद्दल 5 पोलिसांनाही निलंबित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...