आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालघर हिंसा प्रकरण:अटक केलेल्या आरोपींपैकी एकाला कोरोनाची लागण, 23 पोलिसांसह 43 जणांच्या कोरोना चाचण्या होणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पालघरमध्ये आतापर्यंत 170 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

महाराष्ट्रातील पालघरमध्ये साधुंच्या मॉब लिचिंगमध्ये अटक केलेल्या 115 आरोपींपैकी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या 23 पोलिस कर्मचाऱ्यांसह 43 जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात येणार आहेत.

पालघर ग्रामीण हॉस्पीटलचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. दिनकर गावित यांनी सांगितले की, पालघर लिंचिंग प्रकरणातील एका 55 वर्षीय आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. आरोपीला 17 एप्रिलला अटक झाली होती आणि त्याला वाडा पोलिस स्टेशनमधील तुरुंगात कैद होता. संक्रमित दहाणूमधील दिव्य-वाकीपाडाचा रहिवासी आहे. पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्याची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासील जात असून, त्याच्या कुटुंबियांना क्वारेंटाइन करण्यात आले आहे.

14 मे पर्यंत पोलिस कस्टडीमध्ये होता आरोपी

या कोरोना संक्रमित आरोपीला दहाणू न्यायालयात सादर करण्यात आले होते आणि इथर 114 आरोपींसोबत पोलिस कस्टडीत पाठवण्यात आले होते. इतर आरोपींना वाडा, दहाणू, कासा, विक्रमगड, तलासरी आणि इतर पोलिस स्टेशनमधील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.

जेजे हॉस्पिटलच्या जेल वार्डमध्ये शिफ्ट करण्यात येत आहे

डॉ. गावित यांनी सांगितले की, 28 एप्रिलला आरोपीची स्वॅब चाचणी झाली होती, त्यात तो निगेटीव्ह आला होता. पण, शनिवारी सकाळी दुसरी चाचणी घेण्यात आली, त्यात तो पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याला आरएचमध्ये दाखल करण्यात आले होते, पण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आरोपीला मुंबईच्या जेजे मधील जेल वॉर्डमध्ये दाखल करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...