आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॉब लिंचिंग:पालघरमध्ये लॉकडाउनदरम्यान गावात आलेल्या तिघांची गावकऱ्यांकडून हत्या, 200 अज्ञातांविरुद्ध गुन्हा तर 30 जणांना अटक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
याच गाडीमधून पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेले - Divya Marathi
याच गाडीमधून पोलिसांनी तिघांना रुग्णालयात नेले
  • मृतांना कारमधून बाहेर खेचून गावकऱ्यांनी दगड आणि इतर वस्तुंनी मारले

पालघर जिल्ह्यातील कासामध्ये गुरुवारी रात्री चोरीच्या संशयात 3 जणांची गावकऱ्यांकडून हत्या करण्यात आली आहे. गावकऱ्यांनी या तिघांना रात्री एका कारमधून खेचून बाहेर काढले आणि दगड आणि इतर वस्तुंनी मृत्यू होईपर्यंत मारले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्या तिघांचा मृत्यू झाला. अद्याप मृतांची ओळख पटली नाही. या घटनेत अंदाजे 200 लोक सामील असल्याचा पोलिसांना संशय आहे, शुक्रवारी सकाळी पोलिसांनी तीस जणांना ताब्यात घेतले आहे.

मुंबईवरुन आले होते तिघे संशयित

कासा पोलिस स्टेशनचे निरीक्षक आनंदराव काळे यांनी सांगितले की, 'कर्फ्यूदरम्यान गुरुवारी रात्री 9.30 ते 10 वाजेला ही घटना घडली. मृत्यू झालेल्या तिघांची ओळख अद्याप पटली नाही, सध्या त्या तिघांचे मृतदेह शवविच्छदनासाठी पालघरच्या सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तपासास समोर आले की, हे तिघे मुंबईवरुन आले होते. त्यांची कार गडचिंचाळेजवळील ढाबाडी-खानवेल मार्गावरुन हस्तगत करण्यात आली.

कारमधून बाहेर खेचून मारहाण करण्यात आली

काळे यांनी पुढे सांगितले की, तपासात समोर आले की, तिघांना त्यांच्या कारमधून बाहेर खेचून त्यांच्यावर दगड आणि लाठ्यांनी मारहाण करण्यात आली. मृत्यू होण्यापूर्वी तिघांपैकी एकाने पोलिस स्टेशनमध्ये फोन करुन घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळावर पोहचेपर्यंत तिघांना गंभीर मारहाण झाली होती. पोलिसांनी मोठी कसरत करुन तिघांना त्या गावकऱ्यांच्या कचाट्यातून बाहेर काढले आणि सरकारी रुग्णालयात नेले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी 200 अज्ञातांविरोधात कलम 302, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि महामारी रोग अधिनियम 1897 अंतर्गत गुन्हा दाख केला आहे.

बातम्या आणखी आहेत...