आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेक बाऊन्स प्रकरण:पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना मोठा दणका; न्यायालयाने सुनावला 1 वर्षाचा तुरुंगवास आणि पावणे दोन कोटीचा दंड!

पालघर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित अडचणीत सापडले आहेत. गावित यांना न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. चेक बाऊन्स केस प्रकरणात त्यांना पालघर न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने एक वर्ष शिक्षा आणि 1 कोटी 75 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे राजेंद्र गावित यांना हा मोठा दणका बसला आहे. न्यायालयाने सदर दंड आणि शिक्षेला 14 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे.

खासदार राजेंद्र गावित यांच्या विरोधात एका जमिनीच्या व्यवहार प्रकरणी 8 ऑक्टोंबर 2014 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे चिराग बाफना यांनी दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंडागळे यांनी दिला असून, त्यानुसार खासदार राजेंद्र गावित यांना शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला आहे. शिवाय या संदर्भात खासदार राजेंद्र गावित यांना अपिलात जाऊन निकालाविरोधात स्थगिती आणण्याची मुभा देण्यात आली आहे.

जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?

2014 साली राजेंद्र गावित यांनी व्यवसायिक चिराग किर्ती बाफना यांच्याकडून 1 कोटी रुपये घेतले होते. जमिनीच्या व्यवहारासंदर्भात गावित आणि व्यवसायिक चिराग बाफना यांच्यात एक करार झाला होता. परंतू हा व्यवहार पूर्ण न झाल्यामुळे चिराग बाफना यांनी सिव्हील कोर्टात खटला दाखल केला होता.

या खटल्यात सुनावणीदरम्यान 2019 मध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये सामंजस्याने हे प्रकरण निकाली काढण्यावर एकमत झाले. यानंतर खासदार गावित यांनी बाफना यांना अडीच कोटींची रक्कम 7 चेकच्या माध्यमातून देण्याचे मान्य केले. यातला एक कोटींचा चेक पास झाल्यानंतर खासदार गावित यांचे 25 लाखांचे उर्वरित सहा चेक बाऊन्स झाल्यानंतर बाफना यांनी पुन्हा कोर्टात धाव घेतली होती. ज्यावर न्यायालयाने आज ही शिक्षा सुनावली आहे. खासदार गावित यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

बातम्या आणखी आहेत...