आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पालघर मॉब लिंचिंग:सीआयडीने 11 हजार पानांचे दोन आरोपत्र केले दाखल, धार्मिकदृष्टीकोनातून खून झाल्याचे नाकारले; चोर आल्याच्या अफवेमुळे घटना घडल्याचे सांगितले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात पोलिसांचा केला बचाव. त्यात नमूद केले की, जमावाने साधूंना वाचवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. - फाइल फोटो
  • 16 एप्रिल रोजी पालघरमध्ये दोन साधू आणि चालकाची मारहाण करत हत्या केली होती

गुन्हे अन्वेषण विभागाने पालघर मॉब लिंचिंग प्रकरणी बुधवारी डहाणू कोर्टात 11 हजार पानांचे आरोपत्र दाखल केले. 128 आरोपींविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले की, ही मॉब लिंचिंग आधीपासूनच सुनियोजित नव्हती. तर गावात चोर येण्याच्या आणि मुले चोरणाऱ्यांच्या अफवानंतर ही घटना घडली. आरोपपत्रात कोणताही धार्मिक रंग देण्यास नकार देण्यात आला. 

पालघरमध्ये 16 एप्रिल रोजी जुना आखाडाचे महाराज कल्पवृक्ष गिरी(70), त्यांचे सहकारी सुशील गिरी महाराज (35) आणि त्यांच्या चालक निलेश तेलगडे (30) यांना जमावाने मारहाण करत हत्या केली होती. लिंचिंग प्रकरणातील 128 आरोपींपैकी दोन आरोपी अल्पवयीन आहेत. सीआयडीनुसार, अल्पवयीनांना वाचवण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली होती. 

लॉकडाउनपासून बचावासाठी साधुंनी निवडला होता गावचा रस्ता 

आरोपत्रात म्हटले की, लॉकडाउनमुळे सुरतकडे निघालेल्या साधुंनी मुख्य मार्गाऐवजी दाभाडी-खानवेल मार्ग निवडला होता. गडचिंचोले गावातून जाताना लोकांना त्यांच्या पेहरावावर संशय आला आणि अफवा उडाल्याने संपूर्ण गाव तेथे दाखल झाला. या साधुंवर सुमारे 500 लोकांना एकत्र हल्ला केला होता. 

फॉरेंसिक आणि कॉल डिटेलला बनवले आरोपत्राचा आधार 

सीआयडी तपास पथकाचे मुख्य अतिरिक्त संचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, सध्या तपास सुरू आहे. आणखी लोकांना अटक झाल्यानंतर आणि पुरावे मिळाल्यानंतर सीआयडी पूरक चार्जशीट दाखल करेल. आता फॉरेंसिक तज्ज्ञ आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये कॉल डेटा रेकॉर्ड्स आहेत. 

हत्या प्रकरणात 800 लोकांची झाली चौकशी 

सीआयडीने तपासणी दरम्यान 800 संशयित लोकांची चौकशी करून त्यांचे जबाब नोंदवले. 100 पेक्षा अधिक लोकांना प्रत्यक्षदर्शी बनवले. दोन आरोपत्रात एक आरोपत्र 5 हजार तर दुसरे 6000 पानांचे आहे. यामध्ये, अल्पवयीन आरोपींविरूद्ध खटला जुवेनाईल कोर्टात जाईल. 

25 आरोपींचा जामीन फेटाळला

पालघर लिचिंग प्रकरणात 25 आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला. अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. विशेष सरकारी वकील सतीश मनेशेंडे म्हणाले की, सर्व आरोपींनी तांत्रिक कारणास्तव जामीन मागितला होता, जो डहाणू सत्र न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावला.