आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामे:राज्यात 2 लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात मार्चमध्ये झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेती तसेच फळ पिकांच्या बाधित क्षेत्रांचे बहुतांश जिल्ह्यातील पंचनामे पूर्ण झाले आहेत. या कालावधीत एकूण १ लाख ९९ हजार ४८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन विभागाने दिली आहे. ४ मार्च ते २० मार्च २०२३ या कालावधीत राज्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने कडधान्य, फळ पीके, भाजीपाला, गहू, हरभरा, कांदा, द्राक्ष, स्ट्रॉबेरी, संत्रा, मका इत्यादी पिकांचे नुकसान झाले. ४ ते ९ मार्च २०२३ या कालावधीत राज्यातील ३८ हजार ६०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून १५ ते २० मार्च या कालावधीत १ लाख ६० हजार ८८० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.