आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:लॉकडाऊनमुळे गोपीनाथ गडावरील कार्यक्रम रद्दच; मनावर दगड ठेवून दर्शनास येऊ शकत नाही : पंकजा

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंडे समर्थक 3 जून हा दिवस 'संघर्ष दिन' म्हणून साजरा करतात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोपीनाथ मुंडे यांच्या सहाव्या पुण्यतिथीदिनी (३ जून) परळी तालुक्यातील गोपीनाथ गडावर गर्दी न करण्याचे आवाहन पंकजा मुंडे यांनी सोशल मीडियावर केले आहे. काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बुधवारी पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे. 

संचारबंदीमुळे गोपीनाथ गडावर होणारे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. पंकजाही परळीला पोहोचू शकणार नाहीत. त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे भावनिक साद घातली आहे. कार्यकर्ते व समर्थकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहनही पंकजा यांनी केले आहे.

पंकजा मुंडे यांची पोस्ट

मुंडे साहेब जरी आज असले असते तरी त्यांनी प्रशासनाचा मान राखला असता. इथे लोकांचा जीव आणि त्यांचे आरोग्य धोक्यात येईल म्हणून मला कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागत आहे. अगदी मनावर दगड ठेवून.. साहेबांचे दर्शन मी ३ जूनला घेऊ शकत नाही...

बातम्या आणखी आहेत...