आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट आली निगेटिव्ह, दोन दिवसांपासून सर्दी खोकला असल्याने स्वतःला ठेवले होते विलगीकरणात

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!

नुकतीच पदवीधर विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीच्या ऐन एकदिवस आधी, भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची तब्येत अचानक खराब झाली होती. यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली. आता त्यांनी आपल्या तब्येतीविषयी अपडेट दिले आहे. 'माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे' अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी 'मी पंकजा गोपीनाथ मुंडे आपल्याला आव्हान करते की आपण शिरिषजी बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन विजयी करावे. मला सर्दी खोकला व ताप आहे, त्यामुळे मी जवाबदारी स्वीकारून isolate झाले आहे. अर्थाचे अनर्थ करणाऱ्याकडे दुर्लक्ष करावे आणि बोराळकरांच्या पारड्यात पहिली पसंती टाकावी'

टेस्ट आली निगेटिव्ह
पंकजा मुंडेंची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. 'माझी कोविडची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आणि काळजी व्यक्त केली त्यांचे आभार!! मी डॉक्टरांच्या चर्चेनंतर परत एकदा टेस्ट करेन. त्यानंतरच मी सार्वजनिक कार्यक्रमांना हजेरी लावेन'

धनंजय मुंडेंनी दिला होता काळजी घेण्याचा सल्ला
पंकजा यांच्या माहिती नंतर धनंजय मुंडे यांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते की, 'पंकजाताई मी स्वतः कोरोना विषाणूचा त्रास सहन केला आहे, तो त्रास तुझ्या वाट्याला येऊ नये; कोरोनाविषयक सर्व चाचण्या करून घे. स्वतःची व घरच्यांची काळजी घे. तुला काहीही होणार नाही, लवकर बरी हो. मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser