आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Pankaja Munde FIR: 42 People Including 3 Organizers Booked For Violating Corona Guidelines In Pankaja Munde Mumbai Meet News And Updates

42 जणांविरुद्ध गुन्हा:पंकजा मुंडेंच्या मुंबईतील कार्यक्रमावरून 42 जणांवर गुन्हा दाखल, कोरोना काळात निर्बंध मोडून शेकडोंची गर्दी जमवल्याचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंकजा मुंडे यांनी मुंबईत घेतलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळावा निमित्त 42 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना काळात निर्बंध असतानाही मंगळवारी शेकडो लोकांनी गर्दी केली. यासंदर्भात सभा आयोजित करणाऱ्या 3 आयोजकांसह एकूण 42 जणांच्या विरोधात मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात खासदार प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांना डावलण्यात आले. त्यानंतर मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा उठल्या. त्याच चर्चा सुरू असताना पंकजा मुंडेंनी आधी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यानंतर मंगळवारी मुंबईत कार्यकर्त्यांना संबोधित करण्यासाठी सभा घेतली.

या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते आणि मुंडे समर्थक एकत्रित आले होते. वरळी येथे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. या कार्यक्रमावरून 42 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात कलम 188, 269, 37 (3), 135 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून संबंधितांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मुंबईत कार्यकर्ते आणि समर्थकांना संबोधित करताना पंकजा मुंडेंनी राजीनाम्याच्या सर्व शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावल्या. तसेच त्यांना किंवा प्रीतम मुंडे यांना डावलण्याच्या विरोधात ज्या-ज्या समर्थकांनी राजीनामे दिले होते, त्या सर्वांचे राजीनामे नामंजूर केले. केवळ मंत्रिपदाच्या लालसेपोटी मी राजीनामा देणार नाही. माझे नेते अमित शहा आणि नरेंद्र मोदी आहेत. भागवत कराड सुद्धा आपल्याच समाजाचे असून ते आपल्यापेक्षा मोठे आणि जास्त अनुभवी असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. एवढेच नव्हे, तर शेवटी त्यांनी आपण धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करत आहोत असे म्हणताना भाजपवर गुगली टाकण्याचा प्रयत्न देखील सोडला नाही.

बातम्या आणखी आहेत...