आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजीनामा देणार नाही:मला सत्तेची लालसा नाही, मंत्रिपदाच्या लालसेपोटी राजीनामा देणार नाही; पंकजा मुंडेंनी सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे केले नामंजूर

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीएम मोदींच्या भेटीत सांगितले होते कार्यकर्त्यांची समजूत घालेन
  • जगाला गोपिनाथ मुंडे यांचे नाव विसरू देणार नाही -पंकजा मुंडे

मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेतल्यानंतर अखेर पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. मी लालची नाही. मंत्रिपदाच्या लालसेपोटी मी राजीनामा देणार नाही असे पंकजांनी ठणकावून सांगितले. एवढेच नव्हे, तर आपल्याला आणि आपल्या ताई प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नाही यावर अनेक समर्थकांनी राजीनामे दिले होते. त्या सर्वांचे राजीनामे आपण नामंजूर करत असल्याची घोषणा यावेळी पंकजा मुंडे यांनी केली.

मी लालची नाही, मंत्रिपदासाठी राजीनामा देणार नाही

भाजपचे दिवंगत नेते आणि आपले वडील गोपिनाथ मुंडे यांनी मला राजकारणात आणले ते आमदार किंवा मंत्री होण्यासाठी आणलेले नव्हते. त्यांनी सामान्य माणसाच्या हक्कासाठी आपल्या माणसांसाठी युद्ध केले होते. त्याच युद्धात सामान्य माणसांना न्याय देता यावा म्हणून मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणले होते.

मला राजकारणात आणताना मुंडे साहेबांनी भव्य विचार समोर ठेवला होता. माझ्या राजकारणाचा पाया फक्त मला मंत्री करा म्हणून नाहीच. मला मंत्री करा, माझ्या नवऱ्याला करा, माझ्या बहिणीला मंत्री करा असे मी म्हणणार का? आणि माझे कुटुंब माझी बहीणच आहे का? तुम्ही माझे कुटुंब आहात. माझे कार्यकर्ते माझे कुटुंब आहेत. त्यांचे मी खूप-खूप आभार मानते. मला सत्तेची लालच नाही. मी लालची नाही. त्यामुळे मंत्रिपदासाठी मी राजीनामा देईल असे तुम्हाला वाटते का? असेही पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

जगाला गोपिनाथ मुंडे विसरू देणार नाही
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या वडिलांच्या अंत्यविधीची आठवण काढली. "अनेक जण बोलतात की मी वडिलांचे नाव घेत असते. पण, मी या जगाला गोपीनाथ मुंडे हे नाव विसरू देणार नाही. तुम्हाला गोपीनाथ मुंडे यांचा अंत्यविधी आठवत असेल. त्यावेळी सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात शंका होत्या. आक्रोष होता. कित्येकांनी मुंडन केले होते. अंत्यविधीसाठी गेले असताना मलाही धक्के लागले. पण, त्यावेळी मी साहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मनातील साहेबांविषयीचे प्रेम पाहिले. त्यांच्याविषयी असलेली श्रद्धा पाहिली. ते फक्त माझे नव्हे, तर त्या सर्व कार्यकर्त्यांसाठी वडील होते.

माझे भांडण नियतीशी
तुम्ही सर्वांनी माझी संघर्षयात्रा पाहिली, त्यावेळी सुद्धा मी काय म्हटले होते तु्हाला आठवत असेल. माझे भांडण केवळ नियतीशी आहे असे मी म्हणाले होते. माध्यमांनी जरा तपासून पाहावे माझे त्यावेळी केलेले भाषण, मी हेच म्हटले होते. मुंडे साहेबांना, एका सामान्य माणसाला सत्ता मिळाली, मंत्रिपद मिळाले ते नियतीने सामान्य काढून घेतले. मी ते नियतीशी भांडून घेणार आहे. मी म्हटले नव्हते की मी मुंडेंची वारसदार आहे किंवा त्यांची मुलगी आहे. भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असे मला वाटले होते, मुंडे साहेबांना वाटले होते. मी तर स्वतः मी मंत्रिपद नाकारले. त्यावेळी माझे अस्तित्व पणाला लागले होते. आपल्याकडे काही नाही असे वाटले होते. मी आधी जे मंत्रिपद नाकारले त्या मंत्रिपदासाठी मी राजीनामा देणार आहे असे तुम्हाला वाटते का?

पीएम मोदींना सांगितले कार्यकर्त्यांना समजावून सांगेन
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानंतर अनेकांनी मी शक्तीप्रदर्शन करत आहे. किंवा भाजपवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे असे लोकांनी म्हटले. माध्यमांनी त्यावर समाधानकारक वार्तांकन केले यात शंका नाही. परंतु, काहींनी त्याचा अर्थ वेगळा काढला. मला मंत्रिपद मिळाले नाही किंवा प्रीतम मुंडे यांना मंत्रिपद मिळाले नाही. पण, आमच्याच भागातील आपल्या समाजातील ज्येष्ठ नेते भागवत कराड यांना संधी मिळाली यावर मी समाधानी आहे. ते माझ्यापेक्षा अनुभवी आणि वयाने मोठे आहेत. मी त्यांच्यापेक्षा अजून लहानच आहे. मला विचारले जाते की तुमचे नेते कोण आहेत. मी सांगते माझे नेते अमित शहा आहेत, माझे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.

बातम्या आणखी आहेत...