आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप कार्यकारिणी:म्हणे, पंकजांना केंद्रात पाठवू, फोडा अन् राज्य करा धोरणाने पंकजांचा पत्ता कट?

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंडे, खडसे, तावडे, मेहता यांना भाजप कार्यकारिणी स्थान नाही

पंकजांना मुंडेंना डच्चू मिळाल्याने राजकीय वर्तुळात तर्कांना उधाण आले. पंकजांचे विधान परिषदेवर पुनर्वसन करणे तर दूरच पण, त्यांना केंद्रात पाठवण्याच्या नावाखाली राज्यातूनही हद्दपार करण्याची चाल खेळली गेल्याचे म्हटले जात आहे. शुक्रवारी पंकजांना का वगळले, या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, पंकजांना केंद्रात नवी जबाबदारी दिली जाईल. दरम्यान, पंकजांनी ट्विटद्वारे नव्या टीमचे अभिनंदन करत आपल्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केल्याबद्दल पाटलांचे आभार मानले.

प्रीतम मुंडेंना उपाध्यक्षपद

पंकजा या सध्या राज्यात, तर त्यांच्या भगिनी बीडच्या खासदार प्रीतम मुंडे केंद्रात कार्यरत आहेत. मात्र, द्राविडी प्राणायम पद्धतीने प्रीतम यांची वर्णी प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी लावण्यात आली आहे.

...भाजपचा असाही पॅटर्न

1 एकनाथ खडसे मुक्ताईनगरातून तिकीट मागत होते. तेव्हाही असाच प्रकार झाला. खडसेंऐवजी कन्या रोहिणी यांना विधानसभेचे तिकीट देण्यात आले.

2 विधान परिषदेवर वर्णी लागावी, अशी पंकजांची इच्छा होती. मात्र पंकजांच्याच समाजगटातून येणारे रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.

3 चंद्रशेखर बावनकुळे हे गडकरी समर्थक मानले जातात. २०१९ मध्ये बावनकुळेंचे तिकीट कापून पत्नी ज्योती यांना कामठीतून तिकीट दिले.

4 असे प्रकार भाजपमध्ये बहुजन नेत्यांच्या संदर्भात घडत असल्याचा आरोप होत आहे. यामागे फोडा अन् राज्य करा, असे धोरण असल्याचे मानले जात आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser