आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींबाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पंकजा मुंडेंचा खुलासा:माझ्या भाषणाची एक 'सनसनीखेज' ओळ आपल्यापर्यंत आली, आता हेही पाहा

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

"मी जनतेच्या मनात असेल तर मला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील हरवू शकत नाहीत" असे वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मंगळवारी एका कार्यक्रमादरम्यान केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा देखील सुरू आहे. अखेर, या सर्व प्रकरणावर स्वत: पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे.

मोदीजींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असून, यात मोदींबद्दल कुठलेही नकारात्मक उल्लेख केला नाही, असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिले आहे.

पंकजा मुंडे यांनी एक ट्विट करत म्हटले आहे की, “मोदींजींच्या वाढदिवसानिमित्त 17 sep पासून विविध कार्यक्रम केले. त्यात बुद्धिजीवी संमेलन मधील माझ्या भाषणाच्या highlights आपल्यापर्यंत एक ओळ आलीच आहे. "सनसनीखेज" बातम्यातून जमले तर हेही पाहा, मतितार्थ लक्षात येईल. पूर्ण भाषण ऐकावे वाटल्यास या link वर आहेच... ” असे म्हणत मुंडे यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे.

नकारात्मक उल्लेख नाही

"मी आपल्या भाषणातून येणाऱ्या निवडणुकांमध्ये प्रचलित जात, पात, पैसा या मार्गांऐवजी जनतेच्या हृदयात स्थान मिळवण्याकरिता नवीन पद्धतीचे राजकारण करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भाने उपस्थित बालकांच्या पिढीला चांगल्या राजकीय संस्कृतीची गरज सांगत असताना मोदींचा उल्लेख केला होता. त्यामुळे मोदींचा उल्लेख हा सकारात्मक अंगाने केला असून, यात मोदींबद्दल कुठेही नकारात्मक उल्लेख केलेला नाही. पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख सर्वश्रेष्ठ रणधुरंधर राजकीय नेतृत्व या पद्धतीने केलेला आहे. तर चांगले काम केले तर मोदी सुद्धा पराभव करू शकणार नाहीत."

नाराजीतून हे वक्तव्य

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यांवरून राजकीय चर्चांना उधाण आले आहे. मुंडेंना राज्यसभेत स्थान नाही दिले, विधानसभेतही पराभूत करण्यात आले म्हणून नाराजीतून त्यांनी वक्तव्य केले असेल असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केले आहे. पंकजा मुंडेंच्या मनात ही खंत असल्याचेही खडसेंनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या मुंडे?

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी जर जनतेच्या मनात असेल, तर मोदीही माझे राजकारण संपवू शकत नाहीत'' असे खळबळजनक वक्तव्य भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज एका खासगी कार्यक्रमात बोलताना केले. पंकजांच्या या विधानावरून आता आश्चर्य व्यक्त केले जात असून नरेंद्र मोदींनी देशातील वंशवाद संपवला असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...