आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Pankaja Munde | Press Conference | OBC Reservation Mahavikas Aghadi Government Did Not Survive, The State Government Does Not Know The Definition Of Imperial Data! Pankaja Munde's Attack

इम्पेरिकल डेटाची व्याख्या तरी कळते का?:ओबीसी आरक्षण महाविकास आघाडी सरकारमुळेच टिकले नाही, त्यांना इम्पेरिकल डेटाची व्याख्याच माहित नाही! -पंकजा मुंडे

मुंबई4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. महाविकास आघाडी सरकारला इम्पेरिकल डेटाची व्याख्या तरी माहिती आहे का? त्यांना ओबीसींचे आरक्षण असुरक्षित करायचे आहे. असे म्हणत पंकजा मुंडेनी आज पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

पूर्वी महाराष्ट्राची पुरोगामी म्हणून ओळख होती, मात्र आता महाविकास आघाडी सरकार आल्याने राज्यात काय चालले आहे ते सर्वांना माहिती आहे. हे सरकार जनेतच्या हितासाठी कोणतेही पाऊल उचलतांना दिसत नाही. ओबीसींचे आरक्षण देखील यांच्यामुळेच टीकले नाही. असा हल्लाबोल पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

पाठिंशी खंजीर खुपसण्याचे काम सूरू
राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसींच्या पाठिशी खंजीर खुपसण्याचे काम सुरू आहे. असे पंकजा मुंडे म्हणाल्या. ओबीसींचे आरक्षण हे राज्य सरकारमुळे टिकले नाही. स्थगितीनंतरच्या काळात त्यांनी योग्य पाऊले उचलली नाहीत. तसेच त्यांनी ओबीसी आयोगाला वेळेवर निधी दिला नाही. त्यांना केवळ ओबीसी आरक्षण असुरक्षित करायचे आहे. असे म्हणत पंकजांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र केले.

कोणत्याही गोष्टीसाठी केंद्राकडे बोट
राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे जनतेच्या हिताचे नसून, ते काहीही करत नाही. कोणतीही गोष्ट असली की ते केंद्राकडे बोट दाखवतात. कोणतेही कारण असू द्या ते केंद्रावर टीका करत असतात. केंद्राकडे बोट दाखवून राज्य सरकार आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करत आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना तुटपुंजी मदत
राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला होता. त्यात राज्यातील शेतीचे मोठ्य़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा नैराश्यात गेला. त्यांना मदत करण्याचे राज्य सरकारचे कर्तव्य होते. मात्र त्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आली. आता शेतकरी संकटात असताना त्यांच्याकडून वीजबिल वसुली का केली जात आहे? असा सवाल देखील पंकजा मुंडेंनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टी दरम्यान सर्वात आधी भाजप नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. असे देखील पंकजा म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...