आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षनिष्ठा मुंडे साहेबांचे संस्कार:आमच्यावर प्रेम करणारी मंडळी नाराज, पण समजूत घालेन! कदाचित नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याने पक्षाला फायदा होईल; केंद्रातही डावलल्यानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी मंत्रिमंडळाचा विस्तार केला. यामध्ये महाराष्ट्रातून चार जणांना संधी देण्यात आली. मात्र यामध्ये बीडच्या खासदार आणि स्वर्गिय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यांना डावलल्यामुळे त्या नाराज असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. आता या सर्व चर्चांवर पंकजा मुंडेंनी स्पष्टीकरण दिले आहे.

प्रीतम मुंडे यांना पक्षाने डावलल्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यातच पंकजा मुंडे यांनी नवीन मंत्र्यांना शुभेच्छाही दिल्या नसल्याने या चर्चांनी जोर धरला होता. आज त्यांनी या चर्चांवर भाष्य करत पुर्णविराम दिला आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मी पक्षावर नाराज नाही. सर्व नव्या मंत्र्यांचे आता तुमच्या समोर अभिनंदन करते. प्रीतम ताई दोन वेळा सर्वाधिक मताधिक्याने विजय झालेल्या आहेत. त्या उच्चशिक्षित आणि सक्षम आहेत. मात्र कदाचित नवीन चेहर्‍यांना संधी दिल्याने जास्त फायदा होईल असे पक्षाला वाटले असेल म्हणून त्यांनी नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली. पक्षाने घेतलेल्या निर्णय एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आम्हाला मान्यच आहे.'

नवीन लोकांमध्ये पक्षाला फायदा होईल पक्षश्रेष्ठींची धारणा असेल
पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, 'मुंडेना डावलण्याचा प्रश्नच येत नाही. आता जे लोक नवीन मंत्री झाले आहेत ते ही मुंडे परिवारातील आहेत. विधानपरिषद, राज्यसभेच्या वेळी माझ्याही नावाची शेवटपर्यंत चर्चा होती मात्र त्यावेळी पक्षाने नवीन चेहऱ्यांना संधी दिली, कदाचित नवीन लोकांमुळे पक्षाला जास्त फायदा होऊ शकेल अशी पक्षश्रेष्ठींची धारणा असावी.'

पक्षनिष्ठा हेच मुंडे साहेबांनी आमच्यावर केलेले संस्कार

पुढे पंकजा म्हणाल्या की, 'भाजपमध्ये पक्षाचा निर्णय अंतिम असतो तो आम्ही नेहमीच मान्य करत आलो आहोत. आमच्यावर प्रेम करणारी मंडळी नाराज निश्चित आहेच पण मी त्यांची समजूत घालीन कारण पक्षनिष्ठा हेच मुंडे साहेबांनी आमच्यावर केलेले संस्कार आहेत ते आम्ही कधीही सोडणार नाही.'

बातम्या आणखी आहेत...