आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण:पंकजा मुंडेंना केंद्रात मिळणार मोठी जबाबदारी, चंद्रकांत पाटील यांनी दिली माहिती

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात पंकजांऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.

राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या भाजपची महाराष्ट्र कार्यकारिणी जाहीर आता जाहीर झाली आहे. दरम्यान माजी मंत्री पंकजा मुंडे यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान मिळालेलं नाही. मात्र त्यांना केंद्राच्या कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. राज्यात पंकजा मुंडे यांना मोठी जबाबादारी दिली जाणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र राज्यात पंकजांऐवजी खासदार प्रीतम मुंडे यांना राज्य कार्यकारिणीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. 

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले की,  'पंकजाताईंना केंद्रात कार्यकारिणीत चांगली जबाबदारी मिळणआर आहे, त्या कोअर कमिटीच्या सदस्या शंभर टक्के असतील, केंद्राची जबाबदारी आणि महाराष्ट्रातील कोअर कमिटी अशी त्यांची भूमिका असेल', यासोबतच खासदार प्रीतम मुंडे आणि खासदार रक्षा खडसे या दोघींनाही राज्य कार्यकारिणीत जबाबदारी देण्यात आली आहे. यावर स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, या दोनवेळा खासदार आहेत त्यांच्या कामामुळे त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. पंकजाताई किंवा एकनाथ खडसे यांच्या नाराजीमुळे यांना जबाबदारी दिली असं नाही.

दरम्यान पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला होता. राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली होती. यानंतर त्यांना विधान परिषदेवरही जागा देण्यात आली नव्हती. यामुळे पक्षावर त्यांची नाराजी  होती. अनेक वेळा त्यांनी त्यांची नाराजी ही बोलूनही दाखवली होती. दरम्यान आता त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटलांनी केली आहे. 

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser