आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधान परिषद:तिकीट नाकारलेल्या पंकजा मुंडेंसह भाजपमधील खदखद चव्हाट्यावर

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • हर्षवर्धन पाटील, आठवलेही नाराज; निष्ठावंतांना डावलल्याने जनाधारावर परिणाम?

विधान परिषदेसाठी तिकीट नाकारल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पुण्यातील माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि काँग्रेसमधून भाजपवासी झालेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह नाराज निष्ठावंतांची खदखद आता एकापाठोपाठ समोर येत आहे. पंकजा मुंडे यांनी ‘पक्षाच्या निर्णयाचा धक्का बसला नाही... मात्र वाघांनो, असे रडताय काय? मी आहे ना,’ असा दिलासा देऊन समर्थकांना टि्वट करून समजावले आहे. आठवले, कुलकर्णी यांनीही ट्विट करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली आहे.

विधानसभेत डावलेल्या व पराभूत दिग्गज नेत्यांना परिषदेची उमेदवारी देऊन पुनर्वसन केले जाईल अशी आशा होती. मात्र, शुक्रवारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने एकनाथ खडसे, पंकजा मंुडे, विनोद तावडे व चंद्रशेखर बावनकुळे यांच्याऐवजी प्रवीण दटके, रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर आणि अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली.

राम शिंदे, खडसे यांनी शुक्रवारीच आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. तावडे गप्प आहेत, मात्र पंकजा मुंडेंनी शनिवारी टि्वट करून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. गृहमंत्री शहा यांची खप्पामर्जी असलेल्या बावनकुळेंनी सध्या तरी मौन बाळगणे पसंत केले आहे. विधानसभा निवडणुकीत कोथरूडची जागा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांंच्यासाठी सोडणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी ‘आज फिर दिल ने एक तमन्ना की...आज फिर दिल काे हमने समझाया’ हा शेर पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. भाजपमधील नाराजांची संख्या अशीच वाढत राहिल्यास भविष्यात पक्षात बंडाची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर भाजपचा जनाधारही या नाराजीच्या सातत्याच्या प्रकारामुळे वाढत जाईल. पक्षाला याचा मोठा फटका बसू शकतो अशी शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

हर्षवर्धन पाटील समर्थकांत नाराजी : काँग्रेस साेडून भाजपत दाखल झालेले हर्षवर्धन पाटील यांचा इंदापुरात राष्ट्रवादीने पराभव केला. आता त्यांना विधान परिषदेवर घेण्यात न आल्याने समर्थकांत नाराजी पसरली आहे.

आठवलेही नाराज : रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘रिपाइंला एक जागेची आमची मागणी होती. ती पूर्ण झाली नाही. त्यामुळे आमचे कार्यकर्ते नाराज आहेत.’

पंकजांचे टि्वट : वाघांनो, रडताय काय? त्या चौघांनाही आशीर्वाद !

‘आईंना-ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय? ठीक आहे. पण वाघांनो, असं रडताय काय? मी आहे ना. तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही.. बस, साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाहीत... कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशीर्वाद!’    

बातम्या आणखी आहेत...