आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई कोरोना:पनवेल, नवी मुंबईसह उल्हासनगरमध्ये 10 दिवसांचे कडक लॉकडाउन, एका महिन्यात तीन पटीने वाढले कोरोनाचे संक्रमण

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार खुलेच, पनवेलमध्ये केवळ दोन दिवस साहित्य खरेदीची सूट

कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पनवेल, नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये 10 दिवस कडक लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. या ठिकाणी 3 जुलै (शुक्रवार) रात्री 9 वाजल्यापासून 13 जुलै रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत लॉकडाउन लागू राहणार आहे. नवी मुंबई आणि उल्हासनगरमध्ये अशाच स्वरुपाचे आदेश काढण्यात आले आहेत. तर उल्हासनगरमध्ये हा आदेश 2 जुलै पासून 12 जुलै पर्यंत लागू राहणार आहे.

एका महिन्यात तीन पटीने वाढले कोरोनाग्रस्त

नवी मुंबईत गेल्या एका महिन्यापासून कोरोना संक्रमणातून रुग्णांची संख्या 3 पटीने वाढली आहे. गेल्या महिन्यात रुग्णसंख्या 2284 होती ती आता वाढून 6823 वर पोहोचली आहे. या ठिकाणी 1 जून ते 1 जुलै पर्यंत मृतांची संख्या 75 वाढून थेट 217 झाली. केवळ बुधवारीच या ठिकाणी 6 लोकांचा मृत्यू झाला. तसेच 216 नवीन रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळेच, कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

नवी मुंबईत कृषी उत्पन्न बाजार खुलाच

नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अन्नासाहेब मिसळ यांनी सांगितल्याप्रमाणे, "कृषी उत्पन्न बाजार आणि ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्र सोडून संपूर्ण महापालिका हद्दीत 3 जुलै ते 13 जुलै पर्यंत कठोर लॉकडाउन पाळला जाईल. केवळ आवश्यक सेवा आणि वस्तू, आस्थापनांची परवानगी दिली जाणार आहे. खासगी वाहनांना सुद्धा आवश्यक कामांशिवाय सोडले जाणार नाही."

पनवेलमध्ये केवळ दोन दिवस साहित्य खरेदीची सूट

पनवेलमध्ये बुधवारी 136 नवीन रुग्ण समोर आले आहेत. लॉकडाउनमध्ये लोकांना त्रास होऊ नये यासाठी कठोर लॉकडाउनच्या सुरुवातीच्या दोन दिवसांमध्ये लोकांना आवश्यक त्या वस्तू खरेदी करता येणार आहेत.  यानंतरही औषधीची दुकाने सुरूच राहतील. या दोन दिवसांत खरेदी करत असताना दुकान किंवा बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार आहेत. यापूर्वीच पनवेलमध्ये स्थानिक नेते आणि नागरिकांकडून पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. रेड झोन असलेल्या जिल्ह्यांमध्ये सरकारने 31 जुलैपर्यंत कठोर लॉकडाउनच आदेश दिले आहेत.

उल्हासनगरमध्ये केवळ ऑनलाइन खरेदीला परवानगी

उल्हासनगर महापालिकेने बुधवारी 68 नवीन रुग्णांची आकडेवारी जारी केली. गुरुवारपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 1982 झाला. तसेच 48 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या ठिकाणी ऑनलाइन खरेदीला परवानगी देण्यात आली आहे. येथे मास्क न लावता फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...