आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधन:दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आलेले माजी खासदार मोहन रावले यांचे निधन, वयाच्या 72 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोहन रावले हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते.'

शिवसैनिक मोहन रावले यांचे गोव्यात निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 'परळ ब्रँड' शिवसैनिक अशी त्यांची ओळख होती. मोहन रावले हे शिवसेनेचे माजी खासदार असून ते दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा निवडून आले होते. गोव्यात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालावली.

शिवसेना प्रमुखांचे निकटवर्तीय
परळ ब्रँड शिवसैनिक मोहन रावले हे हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय होते. शिवसेनेशी त्यांची नाळ जोडली गेलेली होती. दक्षिण मध्य मुंबईतून पाच वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. साधी राहणी असलेल्या रावले यांचा संपर्क तळागाळातील लोकांशी होता. मुंबईतील मराठीबहुल भागांमध्ये शिवसेना पक्ष वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

राऊतांनी दिली प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊतांनी रावले यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. 'मोहन रावले गेले. कडवट शिवसैनिक..दिलदार दोस्त. शिवसेनेच्या अनेक आंदोलनात रक्त सांडलेले मोहन रावले अचानक सोडून जातील असे वाटले नव्ह्ते. "परळ ब्रँड "शिवसैनिक हीच त्याची ओळख. मोहन पाच वेळा खासदार झाला. पण अखेरपर्यंत तो सगळ्यांसाठी मोहनच राहीला. विनम्र श्रद्धांजली...' असे म्हणत राऊतांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

बातम्या आणखी आहेत...