आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेटरबाॅंम्बमुळे चर्चेत:गृहमंत्र्यांना द्यावा लागला होता राजीनामा, वाचा अंडरवर्ल्ड स्पेशालिस्ट परमबीर सिंह यांच्याबद्दल

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंडरवर्ल्ड स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासादरम्यान साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या अटकेनंतर पुन्हा प्रकाशझोतात आले होते. त्यापाठोपाठ त्यांनी मुंबईचे सीपी असताना मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून चक्क माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले होते. त्यामुळे ते चर्चेत आले यानंतर ते सध्याही चर्चेतच असून त्यांची प्रोफाईल जाणून घेऊ.

साध्वी प्रज्ञा सिंह यांच्या अटक प्रकरणाचा तपास परमबीर सिंह यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांच्या प्रयत्नातूनच प्रज्ञा सिंह यांना अटक करण्यात आली. दिवंगत हेमंत करकरे हे त्यावेळी एटीएस प्रमुख होते.

एटीएसमध्ये IG होते परमबीर सिंह

परमबीर यांनी एटीएसमध्ये डेप्युटी आयजी पदही भूषवले आहे. सिंह यांचा सर्व्हिस रेकॉर्ड चांगला आहे. ते चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षकही राहिले आहेत.

अंडरवर्ल्ड स्पेशालिस्ट म्हणून ओळख

परमबीर सिंह यांना अंडरवर्ल्ड नेटवर्कची पूर्ण माहिती आहे. 1993च्या साखळी बॉम्बस्फोटातील एका आरोपीलाही त्यांनी पकडले. याशिवाय ठाणे पोलीस आयुक्तपदी असताना त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीला ड्रग्ज रॅकेट प्रकरणात आरोपी बनवले. चंदीगडचे डीआयजी शाजी मोहन यांनाही ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अटक करण्यात आली होती. आपल्या कारकिर्दीत परमबीर सिंह यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित अनेक ऑपरेशन केले.

इक्बाल कासकरला पकडण्यात मोठी भूमिका

सप्टेंबर 2017 मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला अटक झाली तेव्हा परमबीर ठाण्याचे पोलीस आयुक्त होते. बिल्डरकडून पैसे उकळल्याच्या आरोपावरून इक्बालला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली होती.

अलीकडेच त्यांनी ठाकरे सरकारच्या कार्यकाळात तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.

अनिल देशमुख यांनी यांनी सचिन वाझे आणि इतर दोन पोलिस अधिकाऱ्यांना शहरातील बार मालकांकडून महिन्याला १०० कोटी वसूल करण्याचा आदेश दिला होता असा गंभीर आरोप करत खळबळ माजवून दिली होती. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याविरोधात अनेक तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु झाली होती. त्यानंतर त्यांची कारागृहातून सुटकाही झाली. तर दुसरीकडे परमबीरसिंह यांच्यावरही निलंबनाची कारवाई झाली होती. यानंतर त्यांना आज शिंदे - फडणवीस सरकारने मोठा दिलासा देत त्यांच्यावरील कारवाई मागे घेतली आहे.