आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परमबीर सिंह यांच्या अर्जावर सुनावणी:परमबीर सिंहप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय ठेवला राखीव; कोर्ट म्हणाले- FIR शिवाय तपास CBI ला द्यायला तुम्ही कायद्यापेक्षा वर आहात का ?

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एफआयआर झालेला नाही आणि ते प्रकरण सीबीआयकडे वर्ग केले गेले आहे असे एखादे प्रकरण आम्हाला सांगा

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील वसूलीच्या आरोपांच्या चौकशीसाठी माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय सुनावणी घेत झाली. यावेळी परमबीर सिंह यांचे वकील विक्रम नानकानीने CBI चौकशीची मागणी केली. यावर चीफ जस्टिस दीपंकर दत्ता म्हणाले, 'FIR केल्याशिवाय आम्ही थेट सीबीआयकडे प्रकरण कसे देऊ शकतो.' तुम्ही एकही असे प्रकरण सांगा, ज्यात FIR न होता थेट सीबीआयला प्रकरण दिले आहे. या युक्तीवादानंतर न्यायालयाने निर्णय राखीव ठेवला आहे.

कोर्ट रूम LIVE

सरन्यायाधीश: आम्ही या प्रकरणात दोन गोष्टींकडे पहात आहोत, ही जनहित याचिका कायम ठेवण्याजोगी आहे का आणि एफआयआरशिवाय कोर्ट आदेश देऊ शकेल का? आपणास आमच्याकडून काही अंतरिम सवलत हवी असल्यास आपणास या मुद्द्यांवर आम्हाला संतुष्ट करावे लागेल.

परमबीर यांचे वकील: नानकानी यांनी सुनावणी दरम्यान माजी गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकांना सादर केलेल्या अहवालाचा हवाला दिला. अतिरिक्त गृहसचिवांना डीजींनी लिहिलेले पत्रही त्यांनी वाचले.

नानकानी पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे आरोप लावले आहेत. निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे.

अ‍ॅडव्होकेट जनरल: महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणाले की, असे अर्ज सुनावणी योग्य नसतात. या संदर्भात मी तुम्हाला काही न्यायनिवाडा दाखवेल. या संदर्भात आपण कायद्याचे पालन केले पाहिजे. माध्यमांमध्ये ज्या आरोपांची चर्चा आहे, ते आम्हाला दूर करायचे आहेत.

परमबीर सिंह यांच्या अर्जात ही मागणी
निलंबित API सचिव वाझेला गृहमंत्री देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी याविषयी सांगितले होते, पण काही दिवसांनी त्यांची बदली झाली, असा परमबीर सिंहांचा दावा आहे. आपल्या बदलीच्या आदेशालाही परमबीर यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणतात की अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बदली-पोस्टिंगच्या अहवालाची चौकशी झाली पाहिजे.

परमबीर यांचा दावा आहे की गृहमंत्री देशमुख सचिन वाझेसोबत आपल्या बंगल्यावर सतत बैठक घेत होते. यावेळी 100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. देशमुख यांच्या बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या चौकशीची मागणीही परमबीर यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...