आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअँटिलिया प्रकरणावरुन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेत संबंधित प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, त्या निर्णयावर आज मुंबई उच्च न्यायालयात आज दुपारी निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमुर्ती जीएस कुळकर्णी यांच्या खंडपीठाने 31 मार्च रोजी संध्याकाळपर्यंत चाललेल्या या सुनावणीदरम्यान आपला निर्णय राखून ठेवला होता.
महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी वसूलीचे गंभीर आरोप लावले होते. याचिकेत म्हटल्यानुसार सिंह यांनी गृहमंत्र्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यासोबतच पोलिस आयुक्त पदावरुन बदली करण्याच्या आदेशालाही आव्हान दिले आहेत. त्यामुळे गृहमंत्री देशमुख यांची सीबीआय चौकशी होणार की नाही? हे आज मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून आहे.
कोर्ट रूम LIVE
सरन्यायाधीश: आम्ही या प्रकरणात दोन गोष्टींकडे पहात आहोत, ही जनहित याचिका कायम ठेवण्याजोगी आहे का आणि एफआयआरशिवाय कोर्ट आदेश देऊ शकेल का? आपणास आमच्याकडून काही अंतरिम सवलत हवी असल्यास आपणास या मुद्द्यांवर आम्हाला संतुष्ट करावे लागेल.
परमबीर यांचे वकील: नानकानी यांनी सुनावणी दरम्यान माजी गुप्तचर आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिस महासंचालकांना सादर केलेल्या अहवालाचा हवाला दिला. अतिरिक्त गृहसचिवांना डीजींनी लिहिलेले पत्रही त्यांनी वाचले.
नानकानी पुढे म्हणाले की, मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने हे आरोप लावले आहेत. निष्पक्ष व स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात यावे.
अॅडव्होकेट जनरल: महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी म्हणाले की, असे अर्ज सुनावणी योग्य नसतात. या संदर्भात मी तुम्हाला काही न्यायनिवाडा दाखवेल. या संदर्भात आपण कायद्याचे पालन केले पाहिजे. माध्यमांमध्ये ज्या आरोपांची चर्चा आहे, ते आम्हाला दूर करायचे आहेत.
परमबीर सिंह यांच्या अर्जात ही मागणी
निलंबित API सचिव वाझेला गृहमंत्री देशमुख यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचे टार्गेट दिल्याचे परमबीर सिंह यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही त्यांनी याविषयी सांगितले होते, पण काही दिवसांनी त्यांची बदली झाली, असा परमबीर सिंहांचा दावा आहे. आपल्या बदलीच्या आदेशालाही परमबीर यांनी आव्हान दिले आहे. ते म्हणतात की अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या बदली-पोस्टिंगच्या अहवालाची चौकशी झाली पाहिजे.
परमबीर यांचा दावा आहे की गृहमंत्री देशमुख सचिन वाझेसोबत आपल्या बंगल्यावर सतत बैठक घेत होते. यावेळी 100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. देशमुख यांच्या बंगल्याच्या सीसीटीव्ही फुटेजच्या चौकशीची मागणीही परमबीर यांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.