आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिल्डरकडून 15 कोटींच्या वसुलीचा आरोप:परमबीर सिंहांविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासासाठी SIT ची स्थापना, त्यांच्या 5 निकटवर्तीय पोलिस अधिकाऱ्यांची झाली बदली

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व आरोपी पोलिस अधिकाऱ्यांची झाली बदली

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढू शकतात. सिंह यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने 7 सदस्यीय एसआयटी टीम गठीत केली आहे. या पथकाचे प्रमुख डीसीपी स्तरीय अधिकारी असतील. मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशनमध्ये बिल्डर राधेश्याम अग्रवाल यांनी परमबीर सिंह आणि इतर 5 पोलिस अधिकाऱ्यांवर मकोकाची खोटी केस दाखल करुन 15 कोटी वसुली केल्याचा आरोप लावला आहे.

अग्रवाल यांच्याविरोधात जुहू पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेल्या मकोका प्रकरणाची चौकशी देखील एसआयटी टीम करेल. परमबीर सिंह कमिश्नर असताना अग्रवालवर छोटा शकीलसोबत संबंध असल्याचा आरोप लावत मकोका केस दाखल झाली होती.

एसआयटी संघात कोणाचा समावेश आहे?
परमबीर सिंह आणि 5 इतर अधिकाऱ्यांविरोधातील प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन झालेल्या एसआयटीमध्ये निमित गोयल (पोलिस उपायुक्त), एमएम मुजावर (सहाय्यक पोलिस आयुक्त), प्रिणम परब (पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा), सचिन पुराणिक (पोलिस निरीक्षक, वसूली विरोधी टीम) विनय घोरपडे (पोलिस निरीक्षक), महेंद्र पाटील (सहाय्यक पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा), विशाल गायकवाड (सहाय्यक पोलिस निरीक्षक, पश्चिम विभाग, सायबर पोलिस ठाणे)

सर्व आरोपी पोलिस अधिकाऱ्यांची झाली बदली
या तपासापूर्वी मुंबईमध्ये परमबीर सिंहांचे निकटवर्तीय मानले जात असेलेल्या पाच पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. यामध्ये 2 DCP, 2 ACP आणि एक महिला इंस्पेक्टरचा समावेश आहे. यांच्यावरही परमबीर सिंहांसोबत वसूली करण्याचा आरोप अग्रवाल यांनी केला आहे.

या अधिकाऱ्यांची झाली बदली

  • डीसीपी डिटेक्शन अकबर पठान
  • पराग मनेरे डीसीपी EOW
  • संजय पाटिल एसीपी
  • श्रीकांत शिंदे एसीपी
  • आशा कोंकरे, इंस्पेक्टर

त्याशिवाय ठाणे शहरातील कोपरी येथे दाखल झालेल्या एफआयआरमध्ये परमबीर सिंह यांच्यासह पराग मनेरे यांचेही नाव आहे. या प्रकरणात सर्व 5 लोकांना लोकल आर्म्स विभाग ज्याला साइड पोस्टिंग विभागही मानले जाते, तिथे पाठवण्यात आले आहे.

बिल्डरचा परमबीरवर आरोप
राधेश्याम अग्रवाल यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात बनावट गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडे सुमारे 15 कोटींची मागणी करण्यात आली होती. असे म्हटले होते की या पैशानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. हे सर्व 2016 पासून चालू आहे असा आरोप देखील करण्यात आला. या बिल्डरने आपल्या तक्रारीत मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि इतरांचे नाव घेतले होते. या संदर्भात या प्रकरणात बिल्डरचे दोन भागीदार सुनील जैन आणि संजय पूर्णिमा यांना अटक करण्यात आली आहे.

या कलमांखाली केस दाखल
मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनमध्ये परमबीर आणि इतर पाच जणांवर आयपीसी कलम 387, 388, 389, 403, 409, 420, 423, 464, 465, 467, 468, 471, 120 (b), 166, 167, 177, 181, 182, 193, 195, 203, 211, 209, 210, 347, 109, 110, 111,113 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

बातम्या आणखी आहेत...