आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसुलीचे प्रकरण:मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना 25 हजार रुपयांचा दंड; अनेक वेळा फोन करूनही चांदीवाल समितीपुढे गैरहजर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चौकशी समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. 100 कोटींच्या वसुली प्रकरणात चांदीवाल समितीने परमबीर सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती कैलास उत्तमचंद चांदीवाल हे या समितीचे प्रमुख असून त्यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाचे तपास सुरु आहे. परमबीर सिंह यांना अनेक वेळा फोन करुनही चौकशी समितीसमोर गैरहजर असल्याचा आरोप समितीने केला आहे. मात्र, चौकशी समितीने परमबीरला शेवटची संधी देत वेळेवर हजर राहण्यास सांगितले आहे.

समितीने परमबीर सिंह यांना एक नवीन समन्स पाठवले आहे. या समन्समध्ये येत्या 3 दिवसांत दंडाची रक्कम मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यास सांगितली आहे. त्याच्यासमोर हजर न झाल्यामुळे तपास थांबवला जाणार नाही असे चौकशी समितीने परमबीरला पाठवलेल्या ताज्या समन्समध्ये म्हटले आहे. समितीने परमबीर सिंह यांना 25 ऑगस्ट रोजी त्यांच्यासमोर हजर राहण्यास सांगितले आहे.

चौकशी समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार
परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर परमबीर सिंह या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, राज्य सरकारने सदरील आरोपांची न्यायालयीन चौकशी करण्यासाठी 30 मार्च रोजी एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. त्यानंतर 3 मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेत राज्य सरकारने दिवाणी न्यायालयाचे अधिकार चौकशी समितीला दिले आहेत.

परमबीर यांच्यावर यापूर्वी 5 हजारांचा दंड
चांदीवाल समितीने यापूर्वी परमबीर सिंह यांच्यावर चौकशी समितीसमोर गैरहजर राहिल्याने 5 हजारांचा दंड ठोठावला होता. समितीने सिंह यांना वारंवार फोन करुनही गैरहजर राहिल्याने आता 25 हजार रुपयांचा दंड दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...