आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Parambir Singh Letter Case Update; Maharashtra Police Department Transfer Recruitment Racket And Demands CBI Inquiry Against Anil Deshmukh

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अँटिलिया प्रकरणात नवा खुलासा:महाराष्ट्र पोलिस खात्यात 'दलाल' चालवतात बदलीचे रॅकेट; गुप्तचर आयुक्तांच्या अहवालावर कारवाई करण्याऐवजी त्यांची हकालपट्टी करण्यात आली

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • माजी गुप्तचर आयुक्तालयाच्या अहवालानुसार हे दलाल निरीक्षक ते आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत संपर्कात होते.

अँटिलिया प्रकरणावरुन मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सोमवारी दाखल केलेल्या याचिकेत त्यांनी गृहमंत्री देशमुख यांच्यावर कारवाई करत सीबीआय चौकशी मागणी केली होती. त्यांनी ऑगस्ट 2020 मध्ये तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केल्याचे त्या याचिकेत म्हटले आहे.

दलालाच्या माध्यमातून पोलिस अधिकाऱ्यांना मनासारखी पोस्टिंग
या तक्रारीनुसार, रश्मी शुक्ला सांगतात की, महाराष्ट्र पोलिस विभागात पदोन्नतीची प्रक्रीया ही दलालांकडून राबवली जात असून यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून मोठी रक्कम स्विकारल्या जात असल्याची तक्रार त्यावेळी त्यांनी महाराष्ट्र पोलिस महासंचालकांकडे केली होती. परंतु, बदल्यात त्यांची आपल्या विभागातून हाकालपट्टी करण्यात आली होती. परमबीर सिंह यांचे आरोप आहेत की, गृहमंत्र्यांने या गोष्टीकडे दुर्लक्ष करत कारवाई केली नव्हती.

आरोपींची फोन पाळत ठेवण्यात आले
शुक्लांनी पत्रात म्हटले आहे की, संबंधित प्रकरणाची पुष्ठी करण्यासाठी यामध्ये सामील सगळ्या लोकांचे फोन नंबर रेकॉर्ड केले गेले. त्यानंतर रेकॉर्डिंगमध्ये मिळलेल्या आकड्यांची जुळवाजुळव केली असता ते खरे साबीत झाले. यामध्ये इंन्‍स्पेक्टर पासून तर मोठ्या-मोठ्या आयपीएस अधिकाऱ्यांपर्यंत हे दलाल लोक सक्रीय असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रानुसार, जून 2017 अशाच प्रकारचे काम करताना मुंबई पोलिसांनी सात लोकांना अटक केली होती. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून नवाज मनेरला अटक करत त्यावर चार्जशीट दाखल करण्यात आली होती. परंतु, हा खटला आतापर्यंत प्रलंबित आहे.

बातम्या आणखी आहेत...