आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटींची वसूली:​​​​​​​परमबीर 8.54 कोटी, तर अनिल देशमुख 7.16 कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक; सचिन वाझेच्या 3 कंपन्या आणि 8 गाड्या

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परमबीर सिंह, DG होमगार्ड, प्रॉपर्टी 8.54 कोटी रुपये

सचिन वाझे प्रकरणात अडकलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसूलीचा आरोप केला आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने एका दुसऱ्या याचिकेवर देशमुखांच्या CBI चौकशीचे आदेश दिले आहेत. यानंतर देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

या प्रकरणात मंत्र्यावर आरोप करणारे माजी आयुक्त परमबीर सिंह यांची सीबीआय चौकशी करेल. या संपूर्ण प्रकरणात आम्ही तीन प्रमुख पात्र परमबीर सिंह, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अटक केलेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) सचिन वाझे यांच्या मालमत्तेच्या तपशिलाबद्दल सांगत आहोत.

परमबीर सिंह, DG होमगार्ड, प्रॉपर्टी 8.54 कोटी रुपये
हरियाणामध्ये परमबीर सिंह यांच्याकडे शेतीची जमीन आहे. सध्या त्याची किंमत 22 लाख रुपये आहे. ही जमीन पूर्णपणे त्यांच्या नावावर आहे. यातून 51 हजारांचे वार्षिक उत्पन्न मिळते. 2003 मध्ये त्यांनी मुंबईच्या जुहू भागात 48.75 लाख रुपयांमध्ये फ्लॅट खरेदी केला होता. सध्या त्याचे मूल्य 4.64 कोटी आहे. हे देखील त्यांच्याच नावावर आहे. यातून वार्षिक उत्पन्न 24.95 लाख रुपये होते. जुहूमध्येच आणखी एक मालमत्ता आहे. मात्र, त्यांनी त्याची किंमत दिलेली नाही. परमबीर सिंह यांचे मासिक वेतन 2.24 लाख रुपये आहे.

नवी मुंबईत 3.60 कोटींचा फ्लॅट
त्याचप्रमाणे नवी मुंबईत 3.60 कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मात्र, त्यांनी याची सध्याची किंमत 2.24 कोटी रुपये असल्याचे सांगितले आहे. हे त्यांच्या आणि पत्नी सविचा सिंह यांच्या नावावर आहे. यासह त्यांचे वार्षिक उत्पन्न 9.60 लाख रुपये होते. चंदीगडमध्ये त्यांचे एक घर असून त्याची किंमत 4 कोटी आहे. हे त्यांच्या आणि त्यांच्या दोन भावांच्या नावावर आहे. हे त्यांचे वडील होशियार सिंह यांच्या नावावर होते. हरियाणाच्या फरीदाबाद येथे त्याच्या मालकीची जमीन आहे. त्याची सध्याची किंमत 14 लाख रुपये आहे. हे परमबीर सिंहांच्या नावावर आहे. त्यांनी हे 2019 मध्ये विकत घेतले.

अनिल देशमुख यांच्याकडे 7.16 कोटी रुपयांची संपत्ती आहे
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे 7.16 कोटींची संपत्ती आहे. निवडणुकीदरम्यान सबमिट केलेल्या कागदपत्रांवरून हा खुलासा झाला आहे. त्यात 27 लाख रुपयांची शेती आहे. बिगर शेती जमिनीची किंमत 12.54 लाख रुपये आहे. एक व्यावसायिक इमारत आहे ज्याची किंमत 1.64 कोटी आहे. हे सर्व महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आहेत. त्यांचा मुंबईतील वरळी आणि नवी मुंबई भागात त्यांचा एक-एक फ्लॅट आहे ज्याची किंमत 3.53 कोटी आहे.

2002 मध्ये खरेदी केला होता वरळीचा फ्लॅट
2002 मध्ये त्यांनी वरळीचा फ्लॅट 55 लाखात खरेदी केला होता. तर नवी मुंबईचा फ्लॅट 2013 मध्ये 23 लाखात खरेदी केला होता. यात त्यांच्या पत्नीचे नावही आहे. त्याचप्रमाणे त्याच्याकडे अन्य जमिनींमध्ये 1.59 कोटींची जमीन आहे. ही जमीन त्यांच्या आणि पत्नीच्या नावावर आहे. अशाप्रकारे, त्याच्या नावावरील मालमत्तेची एकूण किंमत सध्या 3.07 कोटी रुपये आहे आणि पत्नीच्या नावावर असलेल्या मालमत्तेची किंमत 4.08 कोटी रुपये आहे.

सचिन वाझेच्या 3 कंपन्या आणि 8 गाड्या
अटक करण्यात आलेला सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या 3 कंपन्या आहेत. यात मल्टीबिल्ड इन्फ्राप्रोजेक्ट, टेक्निकल सोल्यूशन्स आणि डीजी नेक्स्ट मल्टीमीडिया आहेत. त्यांच्या पार्टनरमध्ये दोन शिवसेनेचे नेते आहेत. संजय माशेलकर आणि विजय गवई अशी त्यांची नावे आहेत. सचिन वाझेकडे 8 वाहने आहेत. तसेच, इटालियन बेनेल्ली कंपनीच्या स्पोर्ट्स बाईकची किंमत सुमारे 7-8 लाख रुपये आहे. 8 लक्झरी कार आणि एका बाईकची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. तर ठाण्यात ते राहतात त्या फ्लॅटची किंमतही एक कोटी असल्याचे सांगितले जात आहे. सचिन वाझेचे मासिक वेतन सुमारे 70 हजार रुपये आहे.

अमिताभ गुप्ता, पुणे पोलिस आयुक्त, मालमत्ता-19.50 कोटी
अमिताभ गुप्ता यांना कोण ओळखत नाही. ते जेव्हा गृह विभागाचे सचिव होते, तेव्हा त्यांना हटवण्यात आले होते कारण यस बँक आणि PMC घोटाळ्यामध्ये अडकलेल्या DHFL च्या वाधवान कुटुंब आणि 25 लोकांना त्यांनी गेल्या वर्षी कोरोनाच्या काळात विशेष पत्र देऊन खंडाळ्याहून महाबळेश्वररला पाठवले होते. यासाठी त्यांनी आपल्या ऑफिशियल लेटरहेडवर प्रवाशांची नावे आणि 6 कारच्या डिटेल्स दिल्या होत्या. त्यांनी वाधवान कुटुंब आपले मित्र असल्याचे सांगितले होते. याची तक्रार मिळाल्यानंतर सरकारने तडकाफडकी त्यांना हटवले. नंतर काही दिवसांनी त्यांना पुण्याचे पोलिस कमिश्नर बनवण्यात आले. ते सध्या तेथेच आहेत.

वांद्र्यामध्ये 4.50 कोटींचा फ्लॅट
अमिताभ यांचा मुंबईच्या वांद्रा परिसरात फ्लॅट आहे. हा फ्लॅट 2005 मध्ये 37 लाखांमध्ये खरेदी केला होता. आज याची किंमत 4.50 कोटी रुपये आहेत. हा फ्लॅट त्यांची पत्नी जुगनू आणि त्यांच्या नावावर आहे. 31.65 लाख रुपये याचे वार्षित उत्पन्न आहे. पुण्यात त्यांची 792 चौरस मीटर जमीन आहे. ही त्यांनी 2015 मध्ये 3.46 कोटी रुपयात खरेदी केली होती. सध्या याची किंमत 4.5 कोटी रुपये आहे. ही जमीन देखील त्यांची पत्नी जुगनू आणि मुलाच्या नावावर आहे.

सांताक्रूजमध्ये 10.5 कोटी रुपयांचा फ्लॅट
त्याच्याकडे मुंबईतील सांताक्रूझमध्ये 2,220स्क्वेअर फूटचा फ्लॅट आहे. हा त्यांनी 9.7 कोटींमध्ये विकत घेतला होता. हा प्रकल्प 2024 पर्यंत पूर्ण होईल. सध्या याची किंमत 10.5 कोटी रुपये आहे. हा फ्लॅट देखील त्यांच्या, पत्नी जुहनू, मुलगा आणि वडिलांच्या नावावर आहे. हा फ्लॅट त्यांनी समर रेडियस रियल्टकडून खरेदी केला आहे. ही कंपनीही 5 वर्षे जुनी आहे. यामध्ये त्यांनी पार्ट पेमेंटच्या रुपात 90 लाख रुपये दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...