आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाटलांचा निशाणा:'शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत उद्धवजी'- चंद्रकांत पाटील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा'

राज्यात मागील काही दिवसांपासून अँटीलिया स्फोटके, मनसुख हिरेन मृत्यू आणि सचिन वाझे प्रकरणाची चर्चा सुरू होती. यातच आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावरुन विरोधक गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही याप्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सतर्कही केले आहे.

भाजपकडून अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केले जात आहे. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, 'दोन-तीन दिवसांपूर्वीच सांगितले होते की, येत्या काळात दोन मंत्र्यांचे राजीनामे येतील. त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी तात्काळ गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. नीतिमत्तेची चाड असेल, तर उद्धव ठाकरे देशमुखांचा राजीनामा घेतील',असे पाटील म्हणाले.

'राष्ट्रवादी तुम्हाला संपवेल...'

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, 'हा आमचा विषय नाही, पण तरीदेखील मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघाले आहेत. पुजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जातो, पण 'त्या' प्रकरणात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही. या प्रकरणात वाझेंना निलंबित केले जाते आणि अनिल देशमुखांना वाचवले जाते. प्रत्येकवेळी राष्ट्रवादी तुमच्यावर दबाब निर्माण करत आहे. म्हणून, तात्काळ देशमुखांचा राजीनामा घ्या', असे पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...