आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:उचलबांगडीनंतरही परमबीर सिंह यांना दिलासा नाहीच; NIA करू शकते चौकशी, या 7 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लवकरच आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी

मुंबई पोलिस आयुक्तपदाची खुर्ची गमावल्यानंतरही परमबीर सिंह यांच्या अडचणी कमी होणार नाहीत. सूत्रांनुसार, अँटिलिया प्रकरणाची चौकशी करणारी NIA टीम लवकरच त्यांची चौकशी करू शकते. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून मान्यताही मागवण्यात आली आहे. अँटिलिया प्रकरणात अटक झालेल्या सचिन वाझे यांनी परमबीर सिंग यांना थेट अहवाल दिला होता. जिलेटिन असलेली स्कॉर्पिओच्या जप्तीनंतर, सचिन वाझेंकडे चौकशी परमबीर सिंह यांनीच सोपवली होती. परमबीरसिंग यांना सध्या होमगार्ड विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

NIA च्या चौकशीत परमबीर सिंह यांना द्यावी लागू शकतात या 7 प्रश्नांची उत्तरे...

  1. सचिन वाझे यांना 16 वर्ष निलंबित केल्यावर कोणत्या आधारावर पुन्हा कामावर घेण्यात आले?
  2. गुन्हे शाखेत अनेक वरिष्ठ असूनही त्यांना सीआययूचा प्रमुख का बनवले?
  3. प्रोटोकॉल नियम बाजूला ठेवून ते थेट आपल्याकडे रिपोर्ट का करत होते?
  4. ते जॉइन झाल्यानंतर लगेच तुम्ही जवळपास सर्वच महत्त्वाची प्रकरणे त्यांच्याकडे का सोपवली?
  5. सहाय्यक पोलिस निरीक्षक असूनही, तुम्हाला कधी वाझेंच्या प्रभावावर शंका नव्हती?
  6. अँटिलिया प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर न्यायालयीन अधिकारी नसतानाही सचिन वाझे यांना चौकशी का सोपवली गेली?
  7. सचिन वाझे यांना विशेष पॉवर देण्यासाठी कोणत्याही राजकीय व्यक्तीचा दबाव होता का?

वाझे यांच्या अटकेनंतर परमबीर सिंह विषयी चर्चा सुरू झाली परमबीर सिंह यांना बुधवारी मुंबई पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकले गेले, परंतु सचिन वाझे यांच्या अटकेनंतर त्यांची हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतरही त्यांना हटवण्यावर चर्चा झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडी नेत्यांच्या बैठकीत परमबीर सिंह यांना हटवण्यावरही चर्चा झाली. आदल्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी हेमंत नगराळे यांच्यासह अनेक मुंबई पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. तेव्हापासून नगराळे यांचे नाव मुंबई पोलिस आयुक्तासाठी चर्चेत होते. बुधवारी महाराष्ट्र गृह विभागाने मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली करण्याचे आदेश जारी केले आणि त्यांच्या जागी नवीन आयुक्ताची नियुक्ती केली.

लवकरच आणखी काही पोलिस अधिकाऱ्यांची चौकशी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएची टीम या प्रकरणात सह पोलिस आयुक्त (क्राइम) मिलिंद भारंबे आणि उप पोलिस आयुक्त (क्राइम) प्रकाश जाधव यांचे जबाबही नोंदवेल. NIA हे जाणून घ्यायचे आहे की कुणाच्या सांगण्यावरुन वाझेंना स्कॉर्पिओ प्रकरणाची चौकशी सोपवण्यात आली होती. NIA भारंबे आणि जाधव यांचा जबाब अत्यंत महत्त्वाचे मानते.

अजित पवारांना दिली होती क्लीनचिट
परमबीरसिंग 2020 च्या फेब्रुवारीमध्ये मुंबई पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई पोलिस आयुक्त होण्यापूर्वी ते लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (ACB) महासंचालक होते. या पोस्टवरही त्यांनी एक निर्णय दिला होता ज्याची खूप चर्चा होती. त्यांच्या कार्यकाळातच नोव्हेंबर 2019 मध्ये ACB ने सिंचन घोटाळ्यात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट दिली होती.

बातम्या आणखी आहेत...