आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयात अर्ज दाखल:परमबीर सिंह यांनी 200 काेटींसाठी छळ केला, बांधकाम व्यावसायिकाचा न्यायालयात अर्ज

मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 15 जूनपर्यंत परमबीर सिंह यांचे अटकेपासूनचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे

पोलिस अधिकारी भीमराज घाडगे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी मुंबई व ठाण्याचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गुरुवारी मुंबईतील एका बांधकाम व्यावसायिकाने सिंह यांनी आपल्याकडून २०० कोटी रुपयांसाठी छळ केला, असा हस्तक्षेप अर्ज उच्च न्यायालयात सादर केला.

१५ जूनपर्यंत परमबीर सिंह यांचे अटकेपासूनचे संरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. १५ जूनच्या पुढील सुनावणीपर्यंत अटक कारवाई करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. नव्या आरोपांमुळे परमबीर सिंह यांच्या अडचणी वाढल्याचे मूळ फिर्यादीचे वकील अॅड. सतीश तळेकर यांनी सांगितले. परमबीर सिंह यांच्यावर पोलिस निरीक्षक भीमराज घाडगे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना परमबीर सिंग यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील बिल्डरांच्या एका भ्रष्टाचार प्रकरणातील अनेक आरोपींची नावे वगळण्यासाठी त्यांनी दबाव आणला. मी त्यांचे ऐकले नाही. म्हणून त्यांनी कट रचून माझ्याविरोधात ५ खोटे गुन्हे नोंदवायला लावले, असे निदर्शनास आणत घाडगे यांनी अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. परमबीर सिंह यांना याआधी झालेल्या सुनावणीमध्ये ९ जूनपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा त्यांना दिलासा मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...