आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Mumbai Police Commissioner | Paramjeet Sing | Parambir Singh Will Appear In India For Questioning Within 48 Hours; Attorney's Claim, Protection From Arrest By Court

परमबीर सिंहाच्या जीवाला धोका:परमबीर सिंह भारतातच 48 तासांत चौकशीसाठी हजर होतील; वकिलाचा दावा, कोर्टाकडून अटकेपासून संरक्षण

मुंबई5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह देश सोडून पळून गेले असल्याचे वृत्त सिंह यांच्या वकिलांनी फेटाळून लावले आहे. परमबीर सिंह हे भारतातच असून, मुंबईत त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती परमबीर यांच्या वकिलांनी आज सर्वोच्च न्यायालयात दिली. यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. सुनावणी अंती न्यायालयाने परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे.

मागील सुनावणी वेळी परमबीर सिंह कुठे गेले अशी विचारला न्यायालयाने केली होती. पुढील सुनावणीत ते कुठे लपून बसले आहे. याची माहिती देण्यास न्यायालयाने त्यांच्या वकिलांना सांगितली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली असून, परमबीर सिंह हे देशाच्या बाहेर गेले नसून ते भारतातच असल्याचे त्यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले आहे. त्यांच्या जीवाला महाराष्ट्रात धोका असल्याने ते महाराष्ट्राबाहेर गेले आहे. असा खुलासा देखील वकिलाने केला आहे.

अनिल देशमुखांनी धमकी दिली

परमबीर सिंह यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, याकरीता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यावर न्यायालयाने त्यांच्याबद्दल माहिती विचारली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी त्यांच्या वकिलांनी परमबीर सिंह नेपाळमार्गे देशाबाहेर गेल्याची माहिती चुकीची असल्याचे म्हटले आहे. "माझ्याजवळ डीजीपींची ऑडिओ टेप आहे, ज्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार मागे घेण्यास सांगितले जात आहे. ते मला धमकी सुद्धा देत आहेत. तक्रार आणि खटले मागे घेतले नाही, तर माझ्यावर अनेक गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे", असे परमबीर सिंह यांच्या वकिलांनी आज न्यायालयात सांगितले आहे.

न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले

परमबीर सिंह यांच्या वकिलांचा भाष्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केले आहे. "हे आश्चर्यकारकच आहे की, मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनाच मुंबईत यायची आणि राहायची भीती वाटते", असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. न्यायमूर्ती कौल म्हणाले की, "माजी पोलीस आयुक्तच त्यांच्या जीवाला धोका असल्याचे सांगत आहेत, हे आश्चर्यकारकच आहे." यावर परमबीर सिंह यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, "सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर वसुली रॅकेट चालवत असल्याचा आरोप केलेला असल्याने त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे."

48 तासात हजर राहणार

परमबीर सिंह यांनी पदावर असताना भ्रष्टाचाराच्या आरोपासाठी ज्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली. त्यांनाच तक्रारदार केले जात असल्याचे त्यांच्या वकिलाने म्हटले. परमबीर सिंह हे 48 तासांमध्ये कोणतेही सीबीआय अधिकारी अथवा कोर्टासमोर हजर राहण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती त्यांच्या वकिलाने दिली. सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंह यांनी चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देत अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. या पुढील सुनावणी सहा डिसेंबर रोजी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...