आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप लावला आहेत. त्यांनी म्हटले की, सचिन वाझेंना गृहमंत्री अनिल देशमुख यांचे संरक्षण होते आणि त्यांनी वाझेंना दर महिन्यात 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते. या सर्व तक्रारींविषयी परमबीर सिंह यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्रही लिहिले होते. दिव्यमराठीच्या हाती हे पत्रही लागले आहे. ज्यामध्ये परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप लावले आहेत. मात्र गृहमंत्री अनिल देशमुखांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.
या पत्रामध्ये परमबीर सिंहांनी लिहिले आहे की, 'महाराष्ट्र सरकारचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना अनेकदा आपला शासकिय बंगला ज्ञानेश्वरमध्ये बोलावले आणि फंड कलेक्ट करण्याचे आदेश दिले. त्यांनी हे पैसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावावर जमा करण्यास सांगितले. या दरम्यान त्यांचे पर्सनल सेक्रेटरी मिस्टर पलांडे देखील उपस्थित राहायचे. गृहमंत्री अनिल देखमुखांनी सचिन वाझेंना दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते.'
शंभर कोटी कसे जमा करायचे हे देखील सांगितले
'घरातील एक दोन स्टाफ मेंबर देखील यावेळी होते. शंभर कोटी जमा करण्यासाठी काय करायचे याविषयीही देशमुखांनी सांगितले होते. यामध्ये देशमुख वाझे यांना म्हणाले होते की, 'मुंबईत 1750 बार आणि रेस्तरॉ आहेत, त्यातल्या प्रत्येकाकडून दोन ते तीन लाख रुपये कलेक्ट केले तरी देखील महिन्याला चाळीस ते पन्नास कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर सोर्सेकडून जमा केली जाऊ शकते.' असेही परमबीर सिंह यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.
देशमुखांचा भ्रष्ट कारभार अनेकांच्या नजरेत
परमबीर सिंहांनी पत्रामध्ये पुढे लिहिले आहे की, 'गृहमंत्री अनिल देशमुखांचा भ्रष्ट कारभार पोलिस दलातील अनेक अधिकाऱ्यांच्या नजेत आलेला होता. देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवत असत. पोलिसांना ते सातत सूचना देत असायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारामध्ये ठेवून देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे जमा करण्यासाठी टार्गेट देत होते. त्या टार्गेटनुससार ते पोलिस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश देत होते. पैसे गोळा करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांचा उपयोग केला जात होता.' असा गंभीर आरोप परमबीर सिंहांनी केला आहे.
शरद पवारांनाही दिली होती माहिती
पुढे परमबीर यांनी लिहिले, 'मी या प्रकरणाविषयी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनाही सांगितले आहे. माझ्यासोबत जे घडले ते चुकीचे घडले, याविषयी मी शरद पवारांना देखील माहिती दिली आहे.'
या आरोपांवर काय म्हणाले गृहमंत्री ?
'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे.' असे म्हणत गृहमंत्री अनिल देखमुखांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.