आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 कोटी वसुली प्रकरणात परमबीर सिंहांचा नवा आरोप:सचिन वाझेंना तुरुंगात विवस्त्र करुन केले जातेय अपमानित, अनिल देशमुखांविरोधातील जबाब बदलण्यासाठी दबाव

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात मुंबई पोलिसांवर नवीन आरोप लावले आहेत. मुंबई पोलिसांच्या कोठडीत कारागृहात असलेले बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर अत्याचार होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तुरुंगात विवस्त्र करुन वाझेंना अपमानित केले जात आहे. अनिल देशमुख यांच्या विरोधात 1OO कोटी वसुलीचे विधान बदलण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला जात आहे.

कोठडीत असतानाही सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांची चांदीवाल आयोगात भेट झाल्याचा आरोप परमबीर सिंहांनी केला आहे. दोघांची प्रदीर्घ भेट झाली आणि यादरम्यान देशमुख यांनी ईडीला दिलेला जबाब मागे घेण्यासाठी वाझे यांच्यावर दबाव आणला होता. ठाणे गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनीही सचिन वाझे यांच्यावर देशमुखांविरोधातील वक्तव्य बदलण्यासाठी दबाव आणला होता.

सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत
परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आर्थर रोड कारागृहात आहेत. सीबीआय आणि ईडी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज अनेकदा फेटाळण्यात आला आहे. सिंह यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, अनिल देशमुख आणि मंत्री अनिल परब हे पोलिसांच्या बदल्या आणि नियुक्त्यांची लिस्ट फायनल करायचे.

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंवरही झाले आरोप
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) दिलेल्या जबाबात परमबीर म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट मुंबई पोलिसांचे एपीआय सचिन वाझे यांना पुन्हा कामावर घेण्याचे निर्देश दिले होते, ज्यांना 16 वर्षांपासून निलंबित करण्यात आले आहे. यानंतर उद्धव यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी केली होती.

मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर वाहनात स्फोटके ठेवणे आणि त्या वाहनाचा मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी सचिन वाझे हा मुख्य आरोपी आहे. ते सध्या मुंबईच्या तळोजा कारागृहात आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्यांना सेवेतून बडतर्फ केले आहे. ज्युनियर असूनही परमबीर सिंहांनी अनेक महत्त्वाच्या प्रकरणांची जबाबदारी सचिन वाझे यांच्यावर दिल्याचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...