आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाराजीनाट्य:परभणीचे नाराज खासदार संजय जाधव घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट, राष्ट्रवादीवर गळचेपीचा आरोप करत दिला होता राजीनामा

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आहे. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून सरकारमध्ये कुरबुरी सुरू आहेत. आता याचाच परिणाम म्हणून परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी राजीनामा दिला आहे. यानंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. या नाट्यानंतर ते आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागत परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तडकाफडकी आपला राजीनामा सादर केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना राजीनामा मागे घेण्याच्या सूचना केली. जाधव हे परभणी विधानसभा मतदारसंघात दोन वेळा आमदार राहिलेले असून आता खासदारकीची दुसरी टर्म भूषवत आहेत.

जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार विजय भांबळे व खासदार संजय जाधव यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. सातत्याने या दोघांमध्ये राजकीय कुरघोड्या चालत आलेल्या आहेत. राज्यातील सत्तेच्या बदललेल्या समीकरणानंतरही राष्ट्रवादीचे भांबळे यांच्याशी खासदार जाधव यांचे कुठल्याही प्रकारचे सख्य नव्हतेच.

या कारणामुळे दिला राजीनामा
गेल्या 8 महिन्यांपासून खा. जाधव जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर अशासकीय प्रशासक नियुक्तीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्यासाठी प्रयत्नशील होते. तसा त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तगादा लावला होता. त्यानंतरही समितीवर प्रशासक म्हणून राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले. दुसऱ्या टर्ममध्ये तरी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागेल, अशी अपेक्षा खासदार जाधव यांना होती. मात्र दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने या बाजार समितीवर पुन्हा राष्ट्रवादीच्या सदस्यांची वर्णी लावली.

...तर खासदारकीचा काय उपयोग?
उद्धव यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात जाधव म्हणाले, राज्यात सरकार असतानाही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागू नये ही दुर्दैवी बाब आहे. जिंतूरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसतानाही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रशासक म्हणून कशी नियुक्ती होऊ शकते? सामान्य कार्यकर्त्यांना खासदार म्हणून आपण न्याय देऊ शकत नसेल तर या पदाचा काय उपयोग? आपण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सैनिक असून भविष्यातही सामान्य कार्यकर्ता म्हणूनच काम करू.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser