आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:‘बार्क’चे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांची तुरुंगात प्रकृती बिघडली

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बार्क या रेटिंग संस्थेचे माजी सीईओ पार्थाे दासगुप्ता यांची शनिवारी पहाटे तुरुंगात अचानक प्रकृती बिघडली. त्यांच्यावर जेजे रुग्णालयाच्या आयसीयूत उपचार सुरू आहेत.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यासोबतचे त्यांचे कथित व्हाॅट्सअॅप चॅट शुक्रवारी व्हायरल झाले होते. तुरुंगात पार्थोंचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. रेटिंग घोटाळ्यात पार्थो यांना २४ डिसेंबरला अटक झाली होती. यानंतर त्यांना नवी मुंबईतील तळोजा कारागृहात ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची ब्लड शुगर वाढली होती.

बातम्या आणखी आहेत...