आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धा हत्याकांड:छतरपूर भागातील जंगलात कवटीचे काही भाग सापडले; ​​​​​​​आरोपी म्हणतो- श्रद्धाच्या तिरस्कारात तिचा फोटो जाळला

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रद्धा वालकर हत्याकांडात दिल्ली पोलिसांना छतरपूर भागातील जंगलात एका कवटीचे काही भाग आणि काही हाडे सापडली. अवशेष श्रद्धाचे आहेत की नाहीत हे डीएनए तपासणीतून समोर येईल.

पोलिस दक्षिण दिल्लीच्या मैदानगढीच्या छतरपूर एन्क्लेव्ह भागातील एका तलावाचा महापालिकेच्या मदतीने उपसा करत आहे. यासोबत पोलिसांचे एक पथक आरोपी आफताब पूनावालाला त्याच्या सदनिकेत घेऊन गेले. त्याने तेथे श्रद्धाची हत्या करून मृतदेहाचे ३५ तुकडे केले होते.

दिल्ली पोलिस आणि रोहिणीच्या न्यायवैद्यकशास्त्र प्रयोगशाळेतील अधिकाऱ्यांनी आफताबची नार्को चाचणी करण्यासाठी बैठक घेतली. न्यायालयाने पोलिसांना ५ दिवसांच्या आत नार्काे टेस्ट करण्याचे निर्देश दिले होते. पोलिस आफताबच्या चौकशीत थर्ड डिग्री टॉर्चर उपायाचा वापर करू शकत नाहीत. आफताबने पोलिसांना सांगितले की, राेजच्या भांडणामुळे त्रस्त होतो. त्याला श्रद्धाचा तिरस्कार झाला. त्याने श्रद्धाशी संबंधित प्रत्येक वस्तू स्वत:पासून दूर केली. यादरम्यान त्याने २३ मे रोजी श्रद्धाचे छायाचित्रही जाळले होते.

बातम्या आणखी आहेत...