आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Passport Verification | E Passport | Mumbai Police Commssioner Sanjay Pandey | Marathi News | Mumbai Police's Big Decision Regarding Passport Verification; The Police Station Will No Longer Be Called For Verification

निर्णयाचे स्वागत:पासपोर्ट व्हेरिफिकेशनबाबत मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय; आता व्हेरिफिकेशनसाठी पोलिस स्टेशनमध्ये जायची गरज नाही

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलिस ठाण्याच्या चकरा मारुन तुम्ही थकला आहात का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. पासपोर्ट व्हेरिफिकेशनबाबत मुंबई पोलिसांनी एक मोठा निर्णय घेतला असून, आता पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी तुम्हाला पोलिस स्टेशनला बोलावले जाणार नाही. पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पासपोर्ट काढणाऱ्यांना पोलिस स्टेशनमध्ये न बोलावण्याचा निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी याबाबत एक घोषणा केली आहे. मात्र, जर कागदपत्र अपूर्ण असेल तर मात्र, तुम्हाला पोलिस स्टेशनमध्ये जावेच लागणार आहे.

मुंबई पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असून, संपूर्ण राज्यभर हीच पद्धत राबविण्यात यावी अशी मागणी देखील होत आहे. जर तुमची कागदपत्र अपुरी असतील किंवा इतर अपवादात्मक परिस्थितीतच नागरिकांना पोलिस स्टेशनला बोलवले जाईल, असे आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांच्या सोयीसाठी 2022-23 पासून ई-पासपोर्ट सुरू करण्यात येईल. अशी घोषणा केली होती. ई-पासपोर्ट सुविधा सुरू झाल्याने नागरिकांची सोय होणार असून, पासपोर्ट व्हेरिफिकशनसाठी पोलिस स्टेशनच्या खेट्या घालावे लागणार नाही. तसेच सुरक्षा वाढेल आणि आंतरराष्ट्रीय प्रवास देखील सुलभ होईल. या पार्श्वभूमीवर राज्यात सुरुवातीला मुंबईत ई-पासपोर्ट व्हेरिफिकशनचा प्रयोग करण्यात येणार असून, पासपोर्ट काढणाऱ्यांना आता पोलिस ठाण्यात बोलावले जाणार नाही.

बातम्या आणखी आहेत...