आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोप:आकडेवारी जास्त दाखवण्यासाठी रुग्णांना मिळतेय सुटी : फडणवीसांचा आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यात सर्वाधिक रुग्ण सोडल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. रुग्णांची आणि मृत्युमुखी पडलेल्यांचीही संख्या वाढत आहे. शुक्रवारी राज्यात सर्वाधित रुग्ण घरी सोडल्याचा दावा सरकारने केला. त्या दाव्यावरच विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केवळ आकडेवारी जास्त दाखवण्यासाठी रुग्णांना घरी सोडले जात आहे. आपले युद्ध कोरोनाशी आहे, आकड्यांशी नाही, असेही त्यांनी सांगितले.

फडणवीस म्हणाले, शुक्रवारी सरकारने ८३८१ रुग्ण घरी सोडले. ११६ रुग्णांचा मृत्यू झाला. म्हणजेच रुग्णांचे घरी जाण्याचे प्रमाण हे सर्वात जास्त असताना मृत्यूची संख्याही सगळ्यात जास्त आहे. रुग्ण बरे होताहेत हे दाखवण्याच्या घाईत मृत्यू होण्याचे प्रमाणसुद्धा वाढत आहे.

बातम्या आणखी आहेत...