आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:कृषी कायद्यांच्या विरोधात आता पवार, ठाकरे रस्त्यावर उतरणार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोघे केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यंाविरोधात रस्त्यावर उतरणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी रविवारी दिली.

मोदी सरकारच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांपासून देशातील शेतकऱी आंदोलन करत आहेत. त्या आंदोलनात आता राज्यातील दोन दिग्गज नेते उतरणार आहेत. शुक्रवारी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली होती. त्यांना आंदोलनात उतरण्याची विनंती केली होती, असे सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे किशोर ढमाले यांनी सांगितले.

२३ ते २६ जानेवारी यादरम्यान सर्व राज्यातील राजभवनाला घेराव घालण्यात येणार आहेत. २३ जानेवारी रोजी राज्यभरातून शेतकरी मुंबईकडे कूच करणार आहेत. २५ जानेवारी रोजी मुंबईत राजभवनला घेराव घातला जाईल आणि २६ जानेवारी आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार असल्याचे माकपचे अशोक ढवळे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...